Sanjiv Goenka Emotional : लखनौच्या पहिल्या विजयानंतर मालक संजीव गोयंका भावूक, भर मैदानात कर्णधार पंतला मारली मिठी, पाहा VIDEO
Sanjiv Goenka Emotional : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या लढतीत कर्णधार ऋषभ पंतने आपल्या बॅटने टीकाकारांची बोलती बंद केली आहे.

Sanjiv Goenka emotional after LSG win 1st match IPL 2026 : आयपीएलच्या १९व्या हंगामातील १० व्या सामन्यात लखनौने संघाने यजमान हैदराबादवर ५ गडी राखून मात करत हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात १५७ धावांचा पाठलाग करताना १९.५ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केला. यानंतर संघाचे मालक संजीव गोयंका भावूक झाल्याचे दिसले.
या अटीतटीच्या लढतीत कर्णधार ऋषभ पंतने आपल्या बॅटने टीकाकारांची बोलती बंद केली आहे. लखनौ सुपर जायंट्ससाठी हा विजय केवळ दोन गुण मिळवून देणारा नव्हता, तर तो त्यांच्या आत्मविश्वासासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. १५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला शेवटच्या षटकात ९ धावांची गरज होती. दबावाच्या क्षणी ऋषभ पंतने आपल्या अनुभवाचा वापर करत तीन चौकार ठोकले आणि एक चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. पंतने ६८ धावांची नाबाद आणि जबाबदार खेळी करत संघाला सावरले.
संजीव गोयंकांचा बदललेला ‘अंदाज’
ಛಲ ಬಿಡದ Pant ಆಟಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕ ಜಯ ಇದು!🌟
ವೀಕ್ಷಿಸಿ | #TATAIPL2026 👉 #RCBvsCSK | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ. #TATAIPL pic.twitter.com/Jg2m53d33p
— Star Sports Kannada (@StarSportsKan) April 5, 2026
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात लखनौला पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यानंतर लखनऊचे मालक संजीव गोयंका आणि ऋषभ पंत यांच्यात मैदानातच झालेली ‘ती’ तीखी बातचीत सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली होती. गोयंकांचा तो रागीट अवतार पाहून चाहत्यांमध्ये नाराजी होती. मात्र, रविवारी चित्र पूर्णपणे वेगळे होते. पंतने विनिंग शॉट मारताच गोयंका स्टँडमध्ये भावूक होऊन टाळ्या वाजवताना दिसले. सामन्यानंतर त्यांनी स्वतः मैदानात येऊन पंतला प्रेमाने मिठी मारली आणि त्याचे कौतुक केले. हा व्हिडीओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
Sanjiv Goenka and Rishabh Pant on the ground after LSG’s first win. pic.twitter.com/cC6oOi0Gqd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 5, 2026
मार्करमचा पाया अन् पंतचा कळस –
प्रत्युत्तरात १५७ धावांचा पाठलाग करताना एडन मार्करमने ४५ धावांची वेगवान खेळी करत लखनऊला भक्कम सुरुवात दिली होती. मात्र, मधल्या फळीत विकेट्स पडल्याने सामन्यात सस्पेन्स निर्माण झाला होता. अशा वेळी पंतने आपली नैसर्गिक आक्रमकता बाजूला ठेवून अत्यंत संयमाने फलंदाजी केली. या विजयामुळे लखनौचा आत्मविश्वास उंचावला असून, पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा त्यांनी हैदराबादमध्ये काढला आहे.





