Pat Cummins Fined : हैदराबादला दुहेरी फटका! पराभवानंतर आता बीसीसीआयने पॅट कमिन्सला ठोठावला दंड; नेमकं कारण काय?
Pat Cummins Fined : या पराभवाच्या धक्क्यातून संघ सावरत असतानाच आता कर्णधार पॅट कमिन्स याच्यावर बीसीसीआयने (BCCI) मोठी कारवाई केली आहे.

Pat Cummins Fined For Slow Over Rate : आयपीएल २०२६ च्या ५६ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला (SRH) गुजरात टायटन्सकडून ८२ धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाच्या धक्क्यातून संघ सावरत असतानाच आता कर्णधार पॅट कमिन्स याच्यावर बीसीसीआयने (BCCI) मोठी कारवाई केली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात स्लो ओव्हर रेटबद्दल कमिन्सला लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पॅट कमिन्सला १२ लाखांचा दंड (Pat Cummins Fined)
आयपीएलने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ निर्धारित वेळेत आपली षटके पूर्ण करण्यात अपयशी ठरला. आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, हा चालू हंगामातील या संघाचा पहिलाच गुन्हा आहे. त्यामुळे स्लो ओव्हर रेटच्या किमान शिक्षेनुसार कर्णधार पॅट कमिन्सला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Pressure on the field… and now off the field too 👀💸
SRH skipper Pat Cummins has been fined ₹12 lakh after Sunrisers Hyderabad maintained a slow over rate against Gujarat Titans 🏏⏳#PatCummins #GTvsSRH #IPL2026 #Cricket pic.twitter.com/tMJ4NemnYP— Cricket Addictor (@AddictorCricket) May 13, 2026
हैदराबादचा लाजिरवाणा पराभव – (Pat Cummins Fined)
या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत १६८ धावा केल्या होत्या. हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीचा विचार करता हे लक्ष्य फारसे मोठे वाटत नव्हते. मात्र, गुजरातच्या गोलंदाजीसमोर हैदराबादचे फलंदाज पत्त्यासारखे कोसळले. अवघ्या १४.५ षटकांत हैदराबादचा संपूर्ण संघ ८६ धावांवर गारद झाला. या ८२ धावांच्या मोठ्या पराभवामुळे संघाच्या नेट रन रेटलाही फटका बसला आहे.
प्लेऑफसाठी ‘करा किंवा मरा’ स्थिती (Pat Cummins Fined)
सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत १२ सामने खेळले असून ते १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र, प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना उर्वरित दोन सामने जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. हैदराबादचा पुढील सामना १८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) होणार असून, शेवटचा लीग सामना २२ मे रोजी आरसीबी (RCB) विरुद्ध रंगणार आहे. जरी हा संघ यंदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असला, तरी आता त्यांना कोणतीही चूक करून चालणार नाही.





