Paris Olympics 2024 (Table Tennis) : श्रीजा अकुलाचा ऐतिहासिक विजय, मनिका बत्राच्या महान विक्रमाशी केली बरोबरी….

Paris Olympics 2024 (Table Tennis) : पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेली भारतीय महिला टेनिसपटू श्रीजा अकुला हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही स्फोटक कामगिरी सुरूच ठेवली आहे. महिला एकेरीत अकुला सर्वोत्तम16 च्या फेरीत (Round of 16) पोहोचली आहे. अकुला प्री-क्वार्टर फायनलमध्ये (उप-उपांत्यफेरी) पोहोचणारी भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे. याआधी, चालू स्पर्धेत भारताच्या मनिका बत्राने महिला एकेरीच्या अंतिम 16 मध्ये प्रवेश केला आहे.
श्रीजा अकुलाने सर्वोत्तम 32 च्या फेरीत (Round of 32) सिंगापूरच्या जियान झेंगचा 4-2 असा पराभव केला. भारतीय खेळाडूने सिंगापूरच्या खेळाडूचा 9-11, 12-10, 11-4, 11-5, 10-12, 12-10 असा पराभव केला. हा सामना सहा गेमपर्यंत चालला. श्रीजा अकुलाने पहिला गेम 9-11 असा गमावल होता, मात्र यानंतर सलग तीन गेम जिंकून जियानला दडपणाखाली आणले.
Sreeja Akula Shines in Paris: Becomes Second Indian Woman to Reach Olympic Table Tennis Round of 16@SreejaAkula31 @mansukhmandviya @IndiaSports @MIB_India @PIB_India @DDNewslive@DDIndialive @AkashvaniAIR @Media_SAI#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics #sreejaakula #tabletennis pic.twitter.com/aX3IXLxq9t
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 31, 2024
श्रीजाने दुसरा गेम 12-10 आणि तिसरा गेम 11-4 असा जिंकला. यानंतर तिने चौथा गेम 11-5 असा जिंकून आघाडी वाढवली. जियान झेंगने पाचव्या गेममध्ये पुनरागमन करत 12-10 असा विजय मिळवला खरा पण यानंतर श्रीजाने सहावा गेम 12-10 असा जिंकून थेट सामनाच जिंकला.
Paris Olympics 2024 (Shooting,Trap) : पराभवासह राजेश्वरी आणि श्रेयसीचे आव्हान संपुष्टात
याआधी पॅरिस ऑलिम्पिकच्या टेबल टेनिस स्पर्धेत श्रीजा अकुलाने स्वीडनच्या क्रिस्टीना कलबर्गचा 11-4, 11-9, 11-7, 11-8 असा पराभव केला होता. पॅरिस ऑलिम्पिकच्या महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत दोन भारतीय खेळाडूंनी उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. याआधी ऑलिम्पिकमध्ये कोणतीही भारतीय महिला टेबल टेनिसपटू अंतिम 16 मध्ये स्थान मिळवू शकली नव्हती.





