Paris Olympics 2024 (Hockey) : टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक; पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनला चारली पराभवाची धूळ…

Paris Olympics 2024 (Hockey) : भारतीय हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत दमदार कामगिरी केली आहे. भारताने ग्रेट ब्रिटनचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता. यानंतर पेनल्टी शूटआऊटव्दारे सामन्याचा निर्णय घेण्यात आला. शूटआउटमध्ये भारताने ब्रिटनचा 4-2 असा पराभव केला.
भारतीय संघाकडून इतिहासाची पुनरावृत्ती…
दरम्यान, 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने ब्रिटनचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता आणि आता 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.भारतीय हॉकी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा पराभव करून इतिहास रचला आणि सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली.
पेनल्टी शूटआऊटव्दारे निकाल…
चार क्वार्टर संपल्यानंतर दोन्ही संघांचा स्कोअर 1-1 असा बरोबरीत होता. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला ज्यामध्ये भारताने ब्रिटनचा 4-2 असा पराभव केला.
A famous victory!!!!
What a game. What a Shootout.
Raj Kumar Pal with the winning penalty shot.
We are in the Semis.
India India 🇮🇳 1 – 1 🇬🇧 Great Britain
SO: 4-2Harmanpreet Singh 22′ (PC)
Lee Morton 27′ #Hockey #HockeyIndia #IndiaKaGame #HockeyLayegaGold… pic.twitter.com/S01hjYbzGr
— Hockey India (@TheHockeyIndia) August 4, 2024
पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताकडून हरमनप्रीत सिंग, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय आणि राज कुमार पाल यांनी प्रत्येकी एक गोल केला तर ब्रिटनसाठी जेम्सने आणि जॅकने प्रत्येकी एक गोल केला. त्याआधी सामन्यामध्ये हरमनप्रीत सिंगने भारतीय संघाला 22 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. पॅरिस ऑलिम्पिकमधील हरमनप्रीतचा हा सातवा गोल होता. भारताने घेतलेली आघाडी फार वेळ टिकली नाही. ली मॉर्टनने काउंटर आक्रमण करत 27 व्या मिनिटाल गोल करत ब्रिटनला बरोबरी साधून दिली आणि निर्धारित वेळेपर्यंत ही बरोबरी कायम राहिली आणि सामना बरोबरीत सुटला.
Paris Olympics 2024(Archery) : दीपिका कुमारीच्या पराभवासह भारताचे तिरंदाजीतील आव्हान संपुष्टात
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूला रेड कार्ड देण्याची पहिलीच वेळ
या सामन्यात भारत 10 खेळाडूंसह खेळत होता कारण अमित रोहिदासला दुस-या क्वार्टरमध्ये रेड कार्ड मिळाल्यामुळे तो संपूर्ण सामन्यातून बाहेर पडला होता. मॅच रेफ्रींनी रोहिदासला एका ब्रिटीश खेळाडूच्या डोक्यात हॉकी स्टिकने जाणूनबुजून दुखापत पोचवल्याबदल दोषी ठरवले आणि त्याला रेड कार्ड देऊन बाहेर पाठवले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूला रेड कार्ड देण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र, भारतीय संघाने हार न मानता अखेरपर्यंत ब्रिटनला कडवी झुंज दिली. अशाप्रकारे भारतीय संघाने पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. जर भारत उपांत्य फेरीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर किमान रौप्यपदक निश्चित होईल. भारताचा उपांत्य फेरीचा सामना मंगळवार, 6 ऑगस्ट रोजी होणार आहे.





