Hockey India 14th Sr. Men National C’ship 2024 : दिल्लीसह कर्नाटक, बंगाल सहज विजयी….

Hockey India 14th Senior Men National Championship 2024 : दिल्ली संघाने जम्मू काश्मीर संघाला 6-0असे एकतर्फी पराभूत करताना, वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील विजयाची नोंद केली.
मंगळवारी झालेल्या लढतीमध्ये दिल्लीच्या नितेशने 34 व 58 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. त्याला भरतने तिसऱ्या, गोविंदसिंगने 14 व्या, मुकुल शर्माने 21 व्या व विकास उपाध्यायने 23 व्या मिनिटाला गोल करताना सुरेख साथ दिली. जम्मू काश्मीर संघाकडून अनेकदा बचावफळीला चकविण्यात यश मिळाले, मात्र त्यांना शेवटपर्यंत गोल करता आला नाही.
Day 2 results from the 14th Hockey India Senior Men National Championship 2024.#HockeyIndia #IndiaKaGame
.
.
.@CMO_Odisha @IndiaSports @Media_SAI @sports_odisha pic.twitter.com/4UowbXQkhn— Hockey India (@TheHockeyIndia) November 5, 2024
या स्पर्धेत दिल्लीशिवाय इतर सामन्यात कर्नाटक, बंगाल आणि आंध्र प्रदेश यांनी देखील सहज विजय मिळवलं. डी पूलमध्ये कर्नाटकने चंदीगडचा 5-1 असा पराभव केला तर त्याच पूलमधील अन्य एका सामन्यात उत्तराखंडने त्रिपुराविरुद्ध 5-0 असा आरामात विजय नोंदवला.
IND vs PAK : …तर भारताचा विराट कोहली अन् पाकचा बाबर एकाच टीमकडून खेळताना दिसतील
पूल एच मध्ये बंगालने आसामचा 10-0 असा पराभव केला तर पूल सी मध्ये आंध्र प्रदेशने अंदमान आणि निकोबारचा 13-0 असा एकतर्फी सामना केला. मध्य प्रदेशने मात्र क गटात यजमान तामिळनाडूला 2-2 असे बरोबरीत रोखले.





