Hockey India 14th Sr. Men National C’ship 2024 : पंजाबची विजयी आगेकूच कायम…

Hockey India 14th Senior Men National Championship 2024 :- पंजाब संघाने दादरा नगर हवेली व दीवदमण संघाला एकतर्फी पराभूत करताना हॉकी इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय पुरुष स्पर्धेत आगेकूच कायम राखली.
Day 6 results from the 14th Hockey India Senior Men National Championship 2024.#HockeyIndia #IndiaKaGame
.
.
.@CMO_Odisha@IndiaSports@Media_SAI@sports_odisha pic.twitter.com/NQDmxRQLom— Hockey India (@TheHockeyIndia) November 9, 2024
अ गटाच्या शनिवारी झालेल्या लढतीमध्ये पंजाब संघाने दादरा नगर हवेली व दीवदमण संघाला ८-० असे एकतर्फी पराभूत केले. पंजाबच्या गुरजिंदर सिंग, सुदर्शन सिंग, प्रदीप सिंग यांनी प्रत्येकी २ गोल करताना संघाला ६-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर जोबनपप्रीत सिंग व गुरसाहिबजीत सिंग यांनी धडाकेबाज मैदानी गोल करताना संघाची आघाडी ८-० अशी वाढविली.
Hockey India 14th Sr. Men National C’ship 2024 : दिल्लीसह कर्नाटक, बंगाल सहज विजयी….
पंजाब संघाच्या जोरदार आक्रमणासमोर दादरा नगर हवेली व दीवदमण संघाचा टिकाव लागला नाही. अनेकदा दादरा नगर हवेली व दीवदमण संघाच्या खेळाडूंनी चांगल्या चाली रचल्या मात्र, पंजाबच्या बचाव फळीने एकदाही दादरा नगर हवेली व दीवदमण संघाला गोल करू दिला नाही.





