Paris Olympics 2024 (Hockey) : बेल्जियम विरुद्ध पराभवानंतरही टीम इंडिया उपांत्यपूर्व फेरीत….

Paris Olympics 2024 (Hockey) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने निराशा केली आहे. भारतीय हॉकी संघाला बेल्जियमविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बेल्जियमने त्याचा 1-2 असा पराभव केला. या सामन्यात अर्ध्या वेळेत भारत 1-0 ने आघाडीवर होता; पण उत्तरार्धात खेळ बदलला. उत्तरार्धात दोन गोल करत बेल्जियमने भारताकडून विजय हिसकावून घेतला. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचा हा पहिलाच पराभव आहे. दुसरीकडे, बेल्जियम या स्पर्धेत अपराजित आहे. अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 5-0 असा पराभव केला.
या ग्रुप मॅचमध्ये टीम इंडियासाठी अभिषेकने सामन्याच्या 18व्या मिनिटाला एकमेव गोल केला. भारतीय पुरुष हॉकी संघाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये आपली आघाडी गमावली आणि बेल्जियमच्या थिब्यू स्टॉकब्रोक्सने 33व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर बेल्जियमसाठी जॉन ड्यूशमनने 44व्या मिनिटाला शानदार गोल करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली आणि बेल्जियमने भारताकडून विजय हिसकावून घेतला.
Full-Time:-
India 🇮🇳 1️⃣ vs 2️⃣ 🇧🇪 Belgium
Abhishek 18′
Thibeau Stockbroekx 33′
John-John Dohmen 44′ (PC)@CMO_Odisha @IndiaSports @Media_SAI@sports_odisha @Limca_Official @CocaCola#HockeyIndia #IndiaKaGame #Hockey #Paris24 #HockeyLayegaGold #IndiaAtParis… pic.twitter.com/wAl31flnHA— Hockey India (@TheHockeyIndia) August 1, 2024
भारत, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ऑलिम्पिकच्या ब गटात आहेत. बेल्जियम 4 विजय आणि 12 गुणांसह गटात पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया3 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताची दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. भारतीय संघ 2 विजय, एक अनिर्णित आणि एक पराभवासह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे 7 अंक आहेत. अर्जेंटिना चौथ्या, न्यूझीलंड पाचव्या आणि आयर्लंड सहाव्या क्रमांकावर आहे. भारताचा पुढील सामना आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना शुक्रवारी होणार आहे. भारतीय हॉकी संघ आधीच उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला असला तरी कमकुवत संघासोबत सामना खेळायचा असेल तर अव्वल 2 स्थान कायम राखावे लागेल.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी भारत आणि बेल्जियम यांच्यात हॉकीमध्ये स्पर्धा झाली. हे दोन्ही संघ आधीच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. या कारणास्तव कोणताही संघ घाईत असल्याचे दिसून आले नाही. दोघांनी पहिल्या क्वार्टरमध्ये एकमेकांना जज केले. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकमेकांविरूध्द आक्रमक खेळ केला.





