Paris Olympics 2024 (Men’s 50m Rifle 3P Final,Swapnil Kusale): पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा आज सहावा दिवस आहे आणि आज भारतीय नेमबाज स्वप्नील कुसाळे याने इतिहास रचला आहे. त्याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत भारतीय नेमबाजाने पदक मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
BRONZE!!! 🚨 ‼️ 🔔
Brilliant by Swapnil Kusale @KusaleSwapnil as he comes back in style in the Standing position to clinch 🥉 in the men’s 50m Rifle 3 Positions with a score of 451.4. 🇨🇳 =gold 🥇, 🇺🇦 = 🥈. 1st Indian to win Oly medal in 3P. Congratulations! 🔥🇮🇳#Paris2024 pic.twitter.com/AtySjSQOsE— NRAI (@OfficialNRAI) August 1, 2024
स्वप्नीलने कुसाळेने 451.4 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. चीनच्या लियू युकुनने 463.6 गुणांसह अव्वल स्थान तर युक्रेनच्या सिरही कुलिशने 461.3 गुणांसह दुसरे स्थान पटकावले.
Paris Olympics 2024 : भारतीय खेळाङूंची पाचव्या दिवसाची कामगिरी…! जाणून घ्या,कोण जिंकलं अन् कोण हरलं…
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताचे हे तिसरे पदक आहे. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत. स्वप्नीलपूर्वी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचवेळी मनूने सरबजोतसह 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले.