Paris Olympics 2024 (Badminton) : चिराग-सात्विक जोडीचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले …

Paris Olympics 2024 (Badminton,Men’s Doubles) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष दुहेरी प्रकारात पदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले आहे. भारतीय शटलर्स सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. भारतीय जोडीविरुद्धचा हा सामना मलेशियाच्या ‘हारोन चिया’ आणि ‘सोह वुई यिक’ या जोडीने 1-2 (21-13, 14-21, 16-21)ने जिंकला.
सात्विक-चिराग जोडीने पहिला गेम 21-13 असा जिंकला. मात्र त्यानंतर सतत पराभवाला सामोरे जावे लागले. मलेशियाच्या चिया आरोन आणि शो वू यिक यांनी दुसरा गेम 14-21 आणि तिसरा गेम 16-21 असा जिंकून भारतीय जोडीला पराभवाचा धक्का दिला .
#Badminton Men’s Doubles Quarterfinals
Satwik and Chirag put up a valiant effort before they went down 1-2 to the World No. 5 Malaysian pair of Chia and Soh.
With this, the pair’s campaign at the #Paris2024Olympics comes to an end.
Continue cheering for our athletes and… pic.twitter.com/nLRjMDqUjN
— SAI Media (@Media_SAI) August 1, 2024
चिया आणि सोह यांचा सात्विक आणि चिराग यांच्याविरुद्ध एकेकाळी 8-0 असा जबरदस्त रेकॉर्ड होता, परंतु भारतीय जोडीने शेवटचे सर्व तीन सामने जिंकून त्यांच्या रेकॉर्डमध्ये सुधारणा केली होती, पण आज भारतीय जोडीला पुन्हा एकदा त्यांच्याविरूध्द पराभव स्विकारावा लागला आहे.
दरम्यान, सात्विक आणि चिराग या माजी जागतिक नंबर वन जोडीने ‘क’ गटात आपले दोन्ही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले होते तर मलेशियन जोडीने ‘अ’ गटात चीनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांच्यानंतर दुसरे स्थान पटकावले होते.





