पुणे जिल्हा | पालखी मार्ग घाणीच्या साम्राज्याने गुदमरतोय

बेलसर, (वार्ताहर) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर पुरंदर तालुक्यात अनेक ठिकाणी कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काही दिवसावर येवून ठेपला असला तरीही प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. तालुक्यात दिवे घाट, बोरावके मळा, शिवरी, वाळुंज फाटा तसेच बेलसर फाटा इतर ठिकाणीही होठ्या प्रमाणात कचरा झाला असल्याने पालखी मार्ग गुदमरतोय असे चित्र निर्माण झाले आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड व जेजुरी मार्ग पुढे प्रस्थान करीत आहे; परंतु पालखी सोहळ्याच्या स्वागतालाच म्हणजे दिवे घाटात कचरायुक्त घाणीच्या साम्राज्याने वारकरी व पालखी सोहळ्याचे स्वागत होणार की काय असा प्रश्न भेडसावत आहे.
दिवे घाटा मध्ये बहुतेक वेळा अज्ञात व्यक्ती कडून कचरा टाकला जातो या कचेर्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. दिवे घाटाच्या सौंदर्यावर मोठा आघात यामुळे होत आहे. तर याचा पायी चालत येणार्या वारकर्यांना मोठा त्रास होऊ शकतो.त्यांचा आरोग्याचा मोठा प्रश्न समोर येवू शकातो.
सासवड पासून जेजुरीकडे येताना बोरावके मळा, शिवरी, वाळुंज फाटा व बेलसर फाटा याठिकाणी महत्त्वाचे व जास्त गर्दीचे पालखी विसावे आहेत. या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे पालखी मार्ग नक्की मोकळा श्वास कधी घेणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पाळखी मार्ग अलीकडील काळात अनेक समस्यांना तोंड देत पूर्णत्वाकडे निघाला आहे; परंतु करोडो रुपये खर्च करुन कचरा, वाहतूक कोंडी, वाहतुकीबाबत चुकीचे नियोजन तसेच वृक्ष लागवड याबाबत प्रशासनाकडून काहीच हालचाली होताना दिसत नाहीत.
तर दुसर्या बाजुला हॉटेल वायवसायिक स्थानिक नागरिक हे देखील कचरा कोठे टाकावा याबद्दल गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. अशा बेजबाबदार व्यावसायिक व नागरिकांवर कारवाई झाली पाहिजे, असेही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
चांगावटेश्वर पालखी मार्गातही कचरा
चांगावटेश्वर पालखी मार्गामध्ये सासवड ते कुंभारवळण रस्त्यावर असलेल्या ओढ्याच्या जवळ मोठ्या प्रमाणात कचरा व दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे नक्की पालखी मार्ग कसा रस्ता काढणार की प्रशासन तत्पर जागे होऊन साफ सफाई चे काम हाती घेणार का हा प्रश्न नागरिक विचारात आहेत.
पालखी मार्गालगत असलेल्या कचर्यामुळे वारकर्यांना व नागरिकांना मोठ्या साथीच्या आजाराला सामोरे जावे लागेल.पालखी सोहळ्यात हे दृश्य योग्य नाही.निदान प्रचंड क्षेत्रावर वाहून जाणारे पाणी उताराला जमीनीत मुरवून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचे नियोजन होणे अत्यावश्यक आहे.-कल्पना साळुंखे, विश्वस्त, ग्राम गौरव प्रतिष्ठान, खळद





