Pune Crime : पुणे हादरलं..! ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू; कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर
Pune Crime : जेजुरीतील बेलसर येथे सांडपाण्याची टाकी साफ करताना ३ कामगारांचा मृत्यू झाला.

Pune Crime : जेजुरीतील बेलसर येथे मशरुम उत्पादक कंपनीच्या आवारातील सांडपाण्याची टाकी साफ करताना विषारी वायूमूळे गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. (Pune Crime)
पिंटू राजेश प्रसाद (वय २३), व्यास सोहम कुमार (वय २२), गौतम रामशरण कुशवाह (वय ३६) अशी मृत्युमुखी पडलेल्या का्मगारांची नावे आहेत. तिघे कामगार मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. (Pune Crime)
दुर्घटनेची पोलिसांकडून चौकशी केली जात असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलसर येथे वाडा ॲग्रो मशरूम कंपनीत मशरुन उत्पादन केले जाते. या कंपनीत १५ ते २० कामगार काम करतात.
कंपनीच्या आवारात भूमिगत टाकी आहे. मशरुम उत्पादन करताना पाणी वापरले जाते. या प्रक्रियेतून बाहेर पडलेले पाणी टाकीत सोडले जाते. ही टाकी स्वच्छ करण्यासाठी एक कामगार टाकीत उतरला. प्रक्रिया करुन टाकीत सोडलेले पाणी साचले होते. या टाकीत विषारी वायू साचला होता. (Pune Crime)
टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या एका कामगाराचा श्वास गुदमरल्याचे लक्षात आल्यानंतर तेथे थांबलेल्या दुसऱ्या कामगाराने त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. तो टाकीत उतरला. मात्र, त्याचाही श्वास गुदमरला. हा प्रकार पाहून तेथे थांबलेला कंपनीतील ठेकेदार घाबरला. (Pune Crime)
त्याने दोघांना टाकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तिघे गुदमरल्याने बेशुद्ध पडले. त्या वेळी कामगारांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. (Pune Crime)
त्यानंतर घटनास्थळी जेसीबी यंत्र मागविण्यात आले. टाकीचा स्लॅब फोडून तिघांना बाहेर काढले. तिघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली. (Pune Crime)
पोलिसांकडून तपास
‘या घटनेत मृत्युमुखी पडलेले तीन कामगार मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. मशरुम उत्पादक कंपनीतील सर्व कामगार हे परप्रांतीय आहेत. टाकीत दोन फूट पाणी होते. मात्र, बरेच दिवस टाकी स्वच्छ करण्यात आली नव्हती. (Pune Crime)
मशरुम उत्पादन करताना प्रक्रिया केलेले पाणी या टाकीत सोडण्यात आले होते. विषारी वायू टाकीत साचला होता. वायूमुळे तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे,’ अशी माहिती जेजुरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली. (Pune Crime)





