बिहारमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत फडकला पॅलेस्टीनचा ध्वज; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल !
Updated On:

दरभंगा – दरभंगा जिल्ह्यात मोहरमच्या मिरवणुकीत एका युवकाने पॅलेस्टिनी ध्वज फडकावत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
जिल्हा मोहरम समितीचे प्रमुख मुन्ना खान यांनी पत्रकारांना सांगितले की, शुक्रवारी किलाघाट परिसरात मोहरमच्या मिरवणुकीत एक तरुण पॅलेस्टिनी ध्वज फडकवताना दिसला.
समितीच्या सदस्यांच्या लक्षात येताच पॅलेस्टिनी ध्वज तात्काळ ताब्यात घेण्यात आला, असेही ते म्हणाले. ही बाब जिल्हा पोलिसांच्या निदर्शनास आली असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
या घटनेचा व्हिडिओ तपासला जात आहे, असे दरभंगाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) जगुनाथ रेड्डी यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. ध्वज फडकावणाऱ्या युवकाची ओळख पटवली जात आहे.





