Palak Tiwari : इब्राहिम अन् पलक तिवारी यांची मूव्ही डेट चर्चेत! Video व्हायरल….

Ibrahim Ali Khan | Palak Tiwari । Sara Ali Khan – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे अनेक बोल्ड फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. वयाची चाळीशी ओलंडल्यानंतरही तिचे सौंदर्य तरुणींना लाजवले असे आहे.
मात्र श्वेताप्रमाणे तिची लेक ‘पलक तिवारी’ देखील अनेकदा चर्चेत राहिली आहे. सध्या सैफ अली खानचा मुलगा ‘इब्राहिम अली खान’ आणि पलकच्या अफेअर चर्चा देखील सुरू आहेत. यातच आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये ती फक्त इब्राहिमसोबतच नाही तर त्याच्या कुटुंबासोबतही दिसू लागली आहे. गुरुवारी रात्री मूव्ही डेटवर आलेले पाहायला मिळालं. पण यावेळी इब्राहिम, पलकसह सारा अली खानही होती. हे तिघेही एकत्र चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी तिघेही एकत्र दिसले. मुंबईतील पीव्हीआर जुहू येथे चित्रपट पाहण्यासाठी गेले होते.
मात्र पापाराझींना पाहाताच इब्राहिम आणि पलक थोडेसे लाजलेले दिसले. तसेच तो कॅमेऱ्याकडेही पाहत नव्हता. दरम्यान, सारा देखील हसत हसत निघून गेली आणि इब्राहिमला चिडवताना दिसली. पलकनेही कॅमेऱ्याकडे न पाहता ती थेट निघून गेली.
View this post on Instagram
दोघांनीही हुडी टीशर्ट घातला होता तर साराही अगदी कॅज्यूअल कपड्यांमध्ये दिसली. तिघांनीही असा एकत्र वेळ घालवण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही हे तिघे सुट्टीसाठी गोव्याला एकत्र गेले होते. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
दरम्यान, पलक आणि इब्राहिम यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास इब्राहिमने अलीकडेच ‘नादानियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून, याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं आहे.
तर दुसरीकडे अभिनेत्री पलकने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर ती मौनी रॉय, संजय दत्त आणि सनी सिंग यांच्या अभिनयाने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूतनी’ चित्रपटात झळकली होती.
पलक ‘बिजली बिजली’ या गाण्यातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. श्वेताप्रमाणे तिची लेक पलक तिवारीने देखील बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पलक तिवारीचे लाखोंच्या घरात चाहते आहेत. जे की, अभिनेत्रीवर खूप प्रेम करतात.





