Babar Azam Instagram : भारताचा पाकिस्तानला दणका: बाबर, रिझवान, आफ्रिदींचे इन्स्टा अकाउंट ब्लॉक

Pakistani cricketers and artists’ Instagram accounts banned in India : २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर भारत सरकारने मोठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत भारतात अनेक पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांची नावेही समाविष्ट झाली आहेत.
भारत सरकारकडून कडक कारवाई –
भारत सरकारने पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांचे भारतातील सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त, स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीविरुद्धही कठोर निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंटही बंद करण्यात आले आहे.
🚨 INSTAGRAM ACCOUNTS OF BABAR AZAM & SHAHEEN AFRIDI HAVE BEEN BANNED IN INDIA. 🚨 pic.twitter.com/GAACT7IG9e
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 2, 2025
यूट्यूब चॅनेलवरही बंदी –
या निर्णयापूर्वी, शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तर सारख्या खेळाडूंच्या यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली होती. याशिवाय, हानिया आमिर, माहिरा खान सारख्या अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांचे सोशल इन्स्टाग्राम अकाउंटही भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये काही पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला पाकिस्तानमध्ये असलेल्या लष्कर-ए-तैयबाने केल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा – RR vs MI : ‘आम्ही सुपरस्टार खरेदी करत नाही, तर बनवतो…’, राजस्थान रॉयल्सच्या कोचचं मोठं वक्तव्य
पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांना मोठा दणका –
🚨 BREAKING NEWS
Modi govt BANS Instagram accounts of Pakistani cricketer Babar Azam & Muhammad Rizwan. pic.twitter.com/XkqLP4FB3s
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) May 2, 2025
धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यानंतर शाहिद आफ्रिदी आणि जुनैद खान सारख्या काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारताची खिल्ली उडवली होती. यानंतर, भारत सरकारने कठोर कारवाई करत पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यास सुरुवात केली. केवळ क्रिकेटपटूच नाही तर भारताने शोएब अख्तर, बासित अली यांसारख्या माजी खेळाडूंचे अकाउंट आणि अनेक पाकिस्तानी बातम्या आणि क्रीडा युट्यूब चॅनेल देखील ब्लॉक केले. आता या पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स आणि प्लेयर्सना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. कारण त्यांना भारतातून भरपूर व्ह्यूज आणि कमाई मिळत होती.





