Pakistan Squad Announce : टी-२० वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंना दिला डच्चू
Pakistan Squad Announce : पीसीबीने आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी पाकिस्तानचा संघ जाहीर केला आहे.

Pakistan Squad Announce for T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या रणधुमाळीला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मेगा स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) रविवारी (२५ जानेवारी) आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघनिवडीत पीसीबीने अनेक धक्कादायक निर्णय घेतले असून, स्टार यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज हारिस रौफ यांना संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
नव्या कर्णधारासह ‘युवा’ खेळाडूंना संधी –
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या पत्रकार परिषदेत पीसीबीने या संघाची घोषणा केली. आगामी विश्वचषकात पाकिस्तानचा संघ सलमान अली आगाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. या संघात बाबर आझम, फखर झमान आणि शाहीन आफ्रिदी यांसारख्या अनुभवी खेळाडूंना स्थान मिळाले आहे, तर ६ खेळाडू पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कप खेळताना दिसणार आहेत.
पहिल्यांदाच विश्वचषक खेळणारे खेळाडू –
पाकिस्तानने जाहीर केलेल्या संघात सहा खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषक खेळण्याची संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये कर्णधार सलमान अली आगा, फहीम अशरफ, ख्वाजा मोहम्मद नफे, मोहम्मद सलमान मिर्झा, साहिबजादा फरहान आणि उस्मान तारिक यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
🚨 PAKISTAN SQUAD FOR THE T20 WORLD CUP 🚨
Salman Ali (C), Abrar, Babar, Faheem, Fakhar, Khawaja Mohammad Nafay, Nawaz, Salman Mirza, Naseem, Sahibzada Farhan, Saim Ayub, Shaheen, Shadab, Usman Khan, Usman Tariq. pic.twitter.com/44yP9tzt81
— Johns. (@CricCrazyJohns) January 25, 2026
भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली!
पाकिस्तानचा टी-२० विश्वचषकासाठी संघ
टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला ‘गट अ’ मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मोहिमेची सुरुवात ७ फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध होईल. मात्र, सर्वांचे लक्ष १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय-व्होल्टेज सामन्यावर असेल.
पाकिस्तानचे टी-२० विश्वचषक २०२६ चे वेळापत्रक:
- ७ फेब्रुवारी: विरुद्ध नेदरलँड्स (कोलंबो)
- १० फेब्रुवारी: विरुद्ध अमेरिका
- १५ फेब्रुवारी: विरुद्ध भारत (कोलंबो)
- १८ फेब्रुवारी: विरुद्ध नामिबिया
टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी पाकिस्तानचा संघ:
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर झमान, मोहम्मद ख्वाजा (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान (यष्टीरक्षक) आणि उस्मान तारिक.





