पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहने ( Naseem Shah ) आपल्या आईच्या दुःखद निधनाबाबत एक भावनिक घटना सांगितली आहे. नसीम शाह ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार होता, त्याच्या एक दिवस आधी त्याच्या आईचे निधन झाले होते. नसीमने वयाच्या १६व्या वर्षी पाकिस्तानी संघात स्थान मिळवले होते. १९ वर्षीय वेगवान गोलंदाज नसीमने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
#BANvsIND | टीम इंडियाची कसोटीवर पकड मजबूत; भारताच्या 404 धावा तर बांगलादेश…
स्काय स्पोर्ट्स स्टारशी बोलताना नसीमने ( Naseem Shah ) आईसोबत जगलेल्या काही भावनिक क्षणांची आठवण करून दिली. यावेळी बोलताना नसीमने त्याच्या आयुष्यातील सर्वात दुःखद घटना सांगितली. नसीम म्हणाला की, “माझ्या आईशी मी खूप जास्त लागावं होता. मी १२ वर्षांचा असताना क्रिकेटमुळे घर सोडले आणि लाहोरला शिफ्ट झालो.”
#BANvsIND | टीम इंडियाची कसोटीवर पकड मजबूत; भारताच्या 404 धावा तर बांगलादेश…
नसीमने ( Naseem Shah ) पुढे बोलताना म्हटले की, “जेव्हा माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण होणार होते, तेव्हा आईने मला एक दिवस आधी फोन केला होता. तेव्हा मी तिला म्हटलो होतो की, मी उद्या पहिला सामना खेळणार आहे. तिने कधीही टीव्ही पाहिला नाही, तिला क्रिकेटही समजत नाही. पण मी तिला म्हणालो, तू उद्याचा सामना पाहा कारण मी खेळत आहे, मी टीव्हीवर लाइव्ह येणार आहे.”
नसीम शाह ( Naseem Shah ) म्हणाला की, “मी खेळणार हे ऐकून ती खूप खूश होती. त्यामुळे तिने खेळ पाहण्यासाठी लाहोरला येणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला टीम मॅनेजमेंटचा फोन आला आणि ते म्हणाले की, तुझ्या आईचे निधन झाले आहे. यानंतर पुढचे सहा ते आठ महिने माझ्यासाठी खूप कठीण गेले. मला आईची खूपच आठवण येत असे आणि सगळीकडे आई दिसायची. पण जेव्हा तुम्ही संघासाठी खेळता तेव्हा तुम्हाला सगळं विसरून चांगली कामगिरी करण्याचा विचार करावं लागतो. मी आता सध्या मानसिक स्थितीने मजबूत आहे, कारण मला माहित आहे की मी या परिस्थितीला हाताळू शकतो.”