चितगाव – भारताने यजमान बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या ( BAN vs IND ) कसोटी सामन्यात आपल्या पहिल्या डावात 404 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर कुलदीप यादव व महंमद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीसमोर गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशची पहिल्या डावात 8 बाद 133 अशी घसरगुंडी उडाली आहे. भारतीय संघाने या कसोटीवर चांगलीच पकड घेतली असून, बांगलादेश फॉलोऑनच्या छायेत आहे.
#FIFAWorldCup2022 । बलाढ्य फ्रान्सची मोरोक्कोवर मात; आता विजेतेपदासाठी अर्जेन्टिनाशी लढत
बुधवारच्या 6 बाद 278 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर श्रेयस अय्यर शतक पूर्ण करण्यात असमर्थ ठरला. तो 86 धावांवर परतल्यावर मात्र रवीचंद्रन अश्विनने कुलदीप यादवच्या साथीत महत्त्वपूर्ण भागीदारी केली व संघाला त्रिशतकी धावांच्या पुढे मजल मारून दिली. अश्विनने अफलातून फलंदाजी करत अर्धशतक साकार केले. त्यानंतर मात्र वेगवान फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो 58 धावांवर बाद झाला. त्याने 113 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार फटकावले.
#FIFAWorldCup2022 । बलाढ्य फ्रान्सची मोरोक्कोवर मात; आता विजेतेपदासाठी अर्जेन्टिनाशी लढत
कुलदीपही चांगला खेळत असताना 114 चेंडूंत 5 चौकार फटकावत 40 धावांवर बाद झाला. तळात उमेश यादव व महंमद सिराजने चमक दाखवताना संघाच्या चारशे धावा फलकावर लावल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन व तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. भारताच्या धावसंख्येचा सामना करताना मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. एकही धाव नसताना त्यांच्या नजमुल हुसेन शांतोला सिराजने बाद केले.
That’s Stumps on Day 2 of the first #BANvIND Test!
A dominating show with the ball by #TeamIndia! 👍👍
4⃣ wickets for @imkuldeep18
3⃣ wickets for @mdsirajofficial
1⃣ wicket for @y_umeshScorecard ▶️ https://t.co/CVZ44NpS5m pic.twitter.com/SkqzNIqlSj
— BCCI (@BCCI) December 15, 2022
त्यानंतर धावफलकावर अवघ्या 5 धावा असताना यासिर अलीही परतला. या धक्क्यातून त्यांचा संघ सावरलाच नाही व ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद झाले. मुशफिकुर रहिम 28, लिटन दास 24 व झाकिर हसन 20 यांनी थोडी चमक दाखवली. फिरकी गोलंदाज कुलदीपने तर त्यांच्या फलंदाजीची वाताहत केली. त्याला सुरेख साथ देताना सिराजनेही आपला वाटा उचलला. या दोघांच्या गोलंदाजीसमोर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा त्यांनी पहिल्या डावात 8 गडी गमावून 133 धावा केल्या आहेत. मेहदी हसन 16 तर ईबादत हुसेन 13 धावांवर खेळत आहेत. भारताकडून कुलदीपने 4 तर सिराजने 3 गडी बाद केले.