‘आमच्या खेळाडूपासून दूर रहा’, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला पाकिस्तानमधून आली धमकी

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. मात्र ती तिच्या अभिनयापेक्षा क्रिकेटमुळे जास्त चर्चेत असते. टीम इंडियाचा विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंतशी तिचे नाव जोडले गेले होते. यानंतर आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे मात्र यावेळी ती भारतीय खेळाडू नाहीतर पाकिस्तानी खेळाडूमुळे चर्चेत आली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहमुळे उर्वशी रौतेला चर्चेत आली आहे.
व्हिडिओ झाला व्हायरल
उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात उर्वशी आपल्या फेव्हरेट पाकिस्तानी क्रिकेटरचा उल्लेख करताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत तुझा फेव्हरेट पाकिस्तान क्रिकेटर कोण आहे असा प्रश्न उर्वशीला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना उर्वशीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह आपला फेव्हरेट खेळाडू असल्याचं म्हटलं आहे.
नसीमबरोबर जोडले गेले होते उर्वशी रौतेलाचे नाव
उर्वशी रौतेला आणि नसीम शाहचं नाव याआधीही चर्चेत होतं. काही वर्षांपूर्वी उर्वशी रौतेला आणि नसीम शाह रिलेशनमध्ये असल्याची जोरदार अफवा पसरली होती. यानंतर उर्वशीवर भारतीय चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. यानंतर एका मुलाखतीत नसीम शाहने उर्वशी रौतेला कोण आहे, आपल्याला माहित नसल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम लावला होता.
उर्वशीला देण्यात आली धमकी
नसीम शाह फेव्हरेट म्हणण्याचा व्हिडिओ समोर आल्यानंर उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे इतकंच नाही तर तिला धमक्याही येऊ लागल्या आहेत. पाकिस्तानच्या काही क्रिकेट चाहत्यांनी उर्वशीला नसीम खानपासून दूर राहण्यास सांगितलं आहे. तर काही क्रिकेट चाहत्यांनी आमच्या मुलांची पाठ सोड असा धमकीवजा इशारा दिला आहे.





