Pakistan Cricket Team Announce : पीसीबीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील टी-20 मालिका आणि श्रीलंका तसेच झिम्बाब्वेसोबतच्या टी-20 तिरंगी मालिकेसाठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही संघ जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बाबर आझम आणि नसीम शाह यांची टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. या दोघांना यापूर्वी आशिया कपसाठी संघातून वगळण्यात आले होते. त्यांच्या या पुनरागमनामुळे 2026 च्या T20 विश्वचषकासाठी त्यांच्या निवडीच्या शक्यता वाढल्या आहेत. टी-20 मालिकेसाठी संघ आणि राखीव खेळाडू – टी-20 संघात अब्दुल समदला संधी देण्यात आली आहे, तर उस्मान तरीक हा एकमेव नवखा खेळाडू आहे. सलमान अली आगा याच्याकडे टी-20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. अनुभवी फलंदाज फखर झमान आणि वेगवान गोलंदाज हारिस रौफ यांना राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 दरम्यान रावळपिंडी आणि लाहोर येथे खेळवली जाईल. त्यानंतर 17 ते 29 नोव्हेंबर 2025 दरम्यान पाकिस्तान श्रीलंका आणि झिम्बाब्वेसोबत टी-20 तिरंगी मालिका खेळणार आहे. पाकिस्तानचा टी-20 संघ: सलमान अली आगा (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, हसन नवाझ, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सॅम अय्यूब, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान (यष्टीरक्षक), उस्मान तरीक. हेही वाचा – SA vs PAK : दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानात ऐतिहासिक विजय! १८ वर्षांनंतर कसोटीत केला खास पराक्रम वनडे मालिकेसाठी शाहीन शाह आफ्रिदी कर्णधार – दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 4 ते 8 नोव्हेंबर 2025 दरम्यान फैसलाबाद येथे खेळवली जाईल. त्यानंतर 11 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान रावळपिंडी येथे श्रीलंकाविरुद्ध आणखी एक वनडे मालिका होईल. या मालिकेसाठी शाहीन शाह आफ्रिदी याच्याकडे 16 सदस्यीय वनडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या संघात फैसल अकरम, हारिस रौफ आणि यष्टीरक्षक-फलंदाज हसीबुल्लाह यांचे पुनरागमन झाले आहे. हेही वाचा – IND vs AUS : विराटने दिले निवृत्तीचे संकेत? सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर VIDEO व्हायरल पाकिस्तानचा वनडे संघ: शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फैसल अकरम, फखर झमान, हॅरिस रऊफ, हसीबुल्लाह, हसन नवाझ, हुसेन तलत, मोहम्मद नवाझ, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, सॅम अय्यूब, सलमान अली आगा.