Naseem Shah : ‘चहा प्यायला चल…!’ पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मराठीने वेधलं लक्ष, VIDEO होतोय व्हायरल

Naseem Shah Marathi video viral : भारत-पाक हे क्रिकेटच्या मैदानावरचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी, या दोन देशांतील खेळाडूंच्या वैयक्तिक संबंधात मात्र आजही जिव्हाळा दिसतो. नुकताच आशिया चषक २०२५ दरम्यान दोन्ही संघांमध्ये तणाव आणि हस्तांदोलन टाळल्याचा प्रसंग घडला असला, तरी सध्या पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहचा ‘मराठी’ बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नसीम शाह सध्या युएईमध्ये सुरू असलेल्या इंटरनॅशनल लीग टी२० (ILT20) स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेदरम्यान त्याला भेटलेल्या एका मराठी सहकाऱ्याकडून त्याने मराठी भाषेचे काही शब्द शिकले आणि ते बोलतानाचा त्याचा व्हिडिओ आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
blockquote class=”twitter-tweet” data-media-max-width=”560″>
Watch naseem shah speak marathi language pic.twitter.com/yybBC6e1GG
— Anuj 🇮🇳 (@AnujKaReview) December 5, 2025
“चहा प्यायला चल” म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल –
Naseem Shah with a Marathi flavour? Here’s the reason behind it. ♥️#Pakistan #Marathi #ILT20 pic.twitter.com/x8m2GAvFmf
— Mr. Cricket UAE (@mrcricketuae) December 8, 2025
या व्हायरल व्हिडीओमध्ये नसीम शाह अत्यंत सहजपणे मराठीत बोलताना दिसतो. “चहा प्यायला चल” असे तो दोन वेळा म्हणतो आणि त्यानंतर चहाचा घोट घेतल्यानंतरही तो मराठी सोडत नाही. चहा प्यायल्यानंतर तो समाधानाने म्हणतो, “आता मला बरं वाटतंय!” ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – PAK vs AUS : इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलिया सतर्क! लाहोरमध्ये सुरक्षा तपासणी सुरू
नसीमच्या या मराठी बोलण्याच्या व्हिडीओबद्दल त्याला विचारले असता, तो म्हणाला, ‘जगभरातील अनेक खेळाडू इथे (ILT20 मध्ये) खेळायला येतात. वेगवेगळ्या देशांतील लोक एकत्र येतात आणि आम्ही इथे एका कुटुंबाप्रमाणे राहतो. कोणी पाकिस्तानमधून, कोणी भारतातून, तर कोणी ऑस्ट्रेलियातून आलेले असतात. क्रिकेट हा असा खेळ आहे, जो लोकांना एकत्र आणतो. एक महिना एकत्र राहायचे असल्याने आम्ही एका कुटुंबासारखे राहतो. आम्ही त्यांना काही ना काही शिकवतो आणि तेदेखील आम्हाला शिकवतात.”
पाकिस्तानच्या खेळाडूंची सोशल मीडिया अकाऊंट्स भारतात बॅन असली तरी, नसीम शाहचा हा व्हिडीओ मात्र भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड ट्रेंड होत आहे. खेळाडूंच्या सीमा ओलांडणाऱ्या या मैत्रीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





