\n\nPCB issues show-cause notice to Naseem Shah over alleged breach of central contract and media policy. The fast bowler has been asked to respond within a stipulated time.https://t.co/RyYuLANiMe#PCB #NaseemShah #Cricket #PSL #PakistanCricket #BreakingNews pic.twitter.com/qZNroaqaYn
\n— The Public Purview (@publicpurviewpk) March 28, 2026
\nवादाचे स्वरूप वाढल्याचे पाहून नसीम शाहने ती पोस्ट डिलीट केली आणि स्पष्टीकरण दिले. त्याने दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले की, “माझे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले होते, जे आता यशस्वीरित्या रिकव्हर करण्यात आले आहे. मागील टिप्पणी ही माझे वैयक्तिक विचार दर्शवत नाही.” मात्र, बोर्डाला त्याचे हे स्पष्टीकरण पुरेसे वाटलेले नाही.
\n\nCM Punjab Maryam Nawaz Sharif at PSL 2026 Opening Ceremony ❣️@MaryamNSharif #MaryamNawazSharif #cmpunjab #PMLN #mns_supreme pic.twitter.com/NW4Kho72mF
\n— Anaya Kareem (@MNS_Supreme) March 27, 2026
\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “नसीम शाहविरुद्ध शिस्तभंग कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याला ठराविक मुदतीत आपले उत्तर द्यावे लागेल. खेळाची प्रतिष्ठा आणि करारातील जबाबदाऱ्यांचे पालन करण्याबाबत बोर्ड कटिबद्ध आहे.” नसीमच्या उत्तरानंतर त्याच्यावर निलंबनाची किंवा दंडाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.