नवी दिल्ली/चंदीगड :- पंजाबमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर मंगळवारी सकाळी सीमा सुरक्षा दलाने दोन सशस्त्र पाकिस्तानी घुसखोरांना गोळ्या घालून ठार केले.
सकाळी 8 च्या सुमारास गुरुदासपूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा पहिला प्रयत्न झाला होता. त्यावेळी बीएसएफने गोळीबार केला. त्या ठिकाणी एक घुसखोर ठार झाला. त्यानंतर सुमारे साडेआठ वाजता गुरुदासपूर सेक्टरमधील चन्नाच्या सीमा चौकीजवळही असाच घुसखोरीचा प्रकार लक्षात आला. त्यातील गोळीबारातही एक घुसखोर ठार झाला.
सध्याच्या थंडीच्या वातावरणाचा लाभ घेऊन पाकिस्तानी हद्दीतून भारतीय हद्दीत घुसखोरी होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीमाभागातील पहारे अधिक सजग करण्यात आले आहेत. ठार झालेल्या घुसखोरांकडे पंप ऍक्शन स्वरूपाच्या बंदुका सापडल्या आहेत. त्या एकाच वेळी अनेक गोळ्या झाडू शकतात.
Maharashtra : मुख्यमंत्री शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार, कधी? वाचा…
सीमेवरील घुसखोरीच्या प्रयत्नात घुसखोर ठार होण्याची नव्या वर्षातील ही पहिली घटना आहे. जम्मू, राजस्थान, गुजरात आणि पंजाब या राज्यांना लागून एकूण 2,289 किमी लांबीची पाकिस्तान सीमा आहे.