पाकिस्तान हादरला.! माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या? ‘तो’ फोटो आला समोर…

Pakistan | Imran Khan : पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता, लष्कराचा हस्तक्षेप आणि दहशतवादी कारवाया हे नवे नाही. मात्र आता समोर आलेल्या एका दाव्यामुळे संपूर्ण पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात हत्या झाल्याची अफवा वेगाने पसरत आहे. सरकार, लष्कर आणि तुरुंग प्रशासन संगनमताने इम्रान खान यांचा छळ करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
2023 पासून इम्रान खान हे रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात कैद आहेत. काही दिवसांपासून त्यांना कोणालाही भेटू दिले जात नसल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळेच त्यांच्या हत्येच्या अफवेला जोर मिळाला आहे.
मंगळवारी (25 नोव्हेंबर) रात्री इम्रान खान यांच्या बहिणी नोरीन खान, अलिमा खान आणि उजमा खान यांना तुरुंग परिसरातून जबरदस्ती बाहेर काढल्याचा आणि त्यांच्यावर मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.
Reports are now surfacing from inside the prisons of PUnjabi Pakistan that Imran Khan, who was being held in custody, has been killed by Asim Munir and his ISI administration according to several news outlets. If this information is confirmed to be true, it marks the absolute end… pic.twitter.com/SbbVB5uJll
— Ministry of Foreign Affairs Baluchistan (@BaluchistanMFA) November 26, 2025
तरीही इम्रान खान यांना कोणत्याही नातेवाईकांशी भेटण्याची परवानगी दिली जात नाही, हीच बाब देशभरात संशय निर्माण करत आहे. त्यामुळे आता इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत.
“इम्रान खान जिवंत असतील तर मग त्यांना भेटण्यास मज्जाव का?” सोशल मीडियावर विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
दाव्याची अधिकृत पुष्टी नाही :
एक्स (पूर्वी ट्विटर)वरील ‘मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स बलुचीस्तान’ नावाच्या खात्यावरूनही इम्रान खान यांच्या हत्या झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या सर्व दाव्यांना अद्याप अधिकृत पुष्टी नाही.
इम्रान खान यांच्या प्रकृतीविषयी, सुरक्षिततेविषयी आणि तुरुंगातील परिस्थितीविषयी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अफवा कितपत खरी आहे याबाबत सरकारकडून स्पष्ट माहिती आलेली नाही.





