\n

बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 205 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या अब्दुल्ला शफिक व फखर झमान या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली. या जोडीने संघाचे अर्धशतक फलकावर लावले. त्यांनी 18 व्या षटकांत संघाला शतकी पल्ला पार करुन दिला. यावेळी शफिकने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. पाठोपाठ झमाननेही षटकार फटकावत अर्धशतक पूर्ण केले.

\n

शफिक 68 धावांवर बाद झाला व ही 128 धावांची भागीदारी संपूष्टात आली. त्याने या खेळीत 69 चेंडूत 9 चौकार व 2 षटकार मारले. कर्णधार बाबर आझम पुन्हा अपयशी ठरला. फखरने संघाला दीडशतकी मजल मारुन दिली. शतकाकडे कूच करत असलेला फखर 81 धावांवर बाद झाला. त्याने 74 चेंडूत 3 चौकार व 7 षटकार फटकावले. त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर महंमद रिझवान नाबाद 26 व इफ्तेखार अहमदने नाबाद 17 धावा करत संघाचा विजय साकार केला. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने 3 गडी बाद केले.

\n

#CWC23 #PAKvBAN : आफ्रिदी-वासीमचा भेदक मारा; बांगलादेशचे पाकसमोर माफक आव्हान…

\n

\n

तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महमदुल्ला रियाधचे अर्धशतक व लिटन दास, कर्णधार शकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने पाकिस्तानसमोर विजयासाठी 205 धावांचे माफक आव्हान ठेवले.

\n

पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रीदीने सलामीवीर तंजीद हसन व नजमुल शांतो यांना पाठोपाठ बाद केले. दुसरीकडून हॅरिस रौफने मुश्‍फिकुर रहीमला बाद करत त्यांची अवस्था एकवेळ 3 बाद 23 अशी बिकट केली होती. मात्र, लिटनने महमदुल्लासह डाव सावरताना संघाचे अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने सावध फलंदाजी करताना एकेरी दुहेरी धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला. या जोडीने संघाचे शतकही साकार केले मात्र, त्याचवेळी अर्धशतकाच्या जवळ आलेला लिटन 45 धावांवर परतला. या खेळीत त्याने 64 चेंडूत 6 चौकार मारले.

\n

महमदुल्लाने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 56 धावांवर बाद झाला. त्याने 70 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावला. तो परतल्यावर आलेल्या तौहीद हिरदोयने निराशा केली. मात्र, एका बाजूने कर्णधार शकिब जबाबदारीने फलंदाजी करत होता. त्याने मेहदीसह पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला.

\n

शकिबही अर्धशतकाच्या जवळ आलेला असताना 43 धावांवर बाद झाला. त्याने 64 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार फटकावले. मेहदीने तळातील फलंदाजांना हाताशी घेत संघाचे द्विशतक फलकावर लावले. भक्कम फलंदाजी करत 25 धावांची खेळी करणारा मेहदीही अनावश्‍यक फटका मारून बाद झाला. त्याने या खेळीत 30 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावला. त्याला बाद केलेल्या महमद वासीम ज्युनिअरने तस्किन अहमद व मुस्तफिजूर रेहमानला बाद केले व बांगलादेशचा डाव 46 व्या षटकांत 204 धावांवर रोखला.

\n

#CWC23 #PAKvBAN : शाहीन आफ्रिदीने केला विश्वविक्रम, स्टार्कलाही टाकलं मागे…

\n

\n

Pakistan vs Bangladesh धावफलक :

\n

पाकिस्तान – 32.3 षटकांत 3 बाद 205 धावा. (फखर झमान 81, अब्दुल्ला शफिक 68, महंमद रिझवान नाबाद 26, इफ्तेखार अहमद नाबाद 17, मेहदी हसन मिराज 3-60).

\n

बांगलादेश – 45.1 षटकांत सर्वबाद 204 धावा. (महमदुल्ला 56, लिटन दास 45, शकिब अल सन 43, मेहदी हसन मिराज 25, शाहीन शाह आफ्रीदी 3-23, महमद वासीम ज्युनिअर 3-31, हॅरीस रौफ 2-36, इफ्तेखार अहमद 1-44, उसामा मीर 1-66).

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#CWC23 #PAKvBAN : चार सामने हरल्यानंतर पाकचा अखेर विजय; स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/pak-3.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pakistan-got-its-third-win-in-the-world-cup-bangladesh-became-the-first-team-to-be-eliminated-from-the-tournament#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/pak-3.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/pakistan-got-its-third-win-in-the-world-cup-bangladesh-became-the-first-team-to-be-eliminated-from-the-tournament#webpage","name":"#CWC23 #PAKvBAN : चार सामने हरल्यानंतर पाकचा अखेर विजय; स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम…","url":"https://www.dainikprabhat.com/pakistan-got-its-third-win-in-the-world-cup-bangladesh-became-the-first-team-to-be-eliminated-from-the-tournament","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pakistan-got-its-third-win-in-the-world-cup-bangladesh-became-the-first-team-to-be-eliminated-from-the-tournament#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/pak-3.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/pakistan-got-its-third-win-in-the-world-cup-bangladesh-became-the-first-team-to-be-eliminated-from-the-tournament#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/pakistan-got-its-third-win-in-the-world-cup-bangladesh-became-the-first-team-to-be-eliminated-from-the-tournament","name":"#CWC23 #PAKvBAN : चार सामने हरल्यानंतर पाकचा अखेर विजय; स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम…"}}]}}}

#CWC23 #PAKvBAN : चार सामने हरल्यानंतर पाकचा अखेर विजय; स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम…