PAK vs BAN : पाकिस्तानची लाजिरवाणी चूक; गल्ली क्रिकेटमधील मुलेही करणार नाहीत, पाहा VIDEO

PAK vs BAN Match Funny Video : आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाची निराशाजनक कामगिरी कायम आहे. काही सामन्यांमध्ये विजय मिळवूनही पाकिस्तानी संघाची एकूण कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. गुरुवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या महत्त्वपूर्ण सामन्यातही संघाच्या लापरवाहीचा कळस दिसून आला. या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी अशी हास्यास्पद चूक केली, जी गल्ली क्रिकेट खेळणारे मुले देखील करणार नाहीत.
पाकिस्तान-बांगलादेश सामन्यातील निष्काळजीपणा –
गुरुवारी झालेल्या या महत्त्वपूर्ण सामन्यातून भारताच्या फायनलमधील प्रतिस्पर्धी संघ ठरणार होता. भारतीय संघाने यापूर्वीच फायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे, तर श्रीलंका संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार जाकेर अलीने नाणेफेक जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या दहा षटकांत संघ केवळ ४६ धावा करू शकला. विशेष म्हणजे, ही धावसंख्या ४७ असू शकली असती, परंतु पाकिस्तानी फलंदाजांच्या निष्काळजीपणामुळे एक धाव कमी झाली.
Pakistan thought they stole an extra run only to realize they were caught short 🧐
Watch #PAKvBAN LIVE NOW on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 pic.twitter.com/jTcY1m7txH
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 25, 2025
मोहम्मद हारिसची लाजिरवाणी चूक –
दहाव्या षटकात मेहदी हसन गोलंदाजी करत होता, तेव्हा पाकिस्तानचा कर्णधार सलमान क्रीझवर होता. षटकातील शेवटच्या चेंडूवर सलमानने लाँग ऑनच्या दिशेने फटका मारला. बांगलादेशचा क्षेत्ररक्षक रिशादने चेंडूवर झेप घेतली, परंतु चेंडू नीट पकडता आला नाही. यामुळे फलंदाजांना दोन धावा घेण्याची संधी होती आणि त्यांनी त्या दिशेने धावण्यास सुरुवातही केली. प्रत्यक्षात दोन धावा पूर्ण झाल्या असा भास झाला, परंतु मोहम्मद हारिसने क्रीझवर बॅट न ठेवता परत फिरण्याची घाई केली. यामुळे अंपायरने ही धाव फक्त एकाच धावेत गणली.
हेही वाचा – Jasprit Bumrah : भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूवर संतापला बुमराह! चुकीची माहिती पसरवल्याचा केला आरोप
एक धावेचे महत्त्व –
क्रिकेटमध्ये, विशेषतः टी-२० क्रिकेटमध्ये एक धाव देखील अत्यंत महत्त्वाची ठरते. अनेक सामन्यांमध्ये एका धावेने विजय-पराजय झाले आहेत. या सामन्यातील पाकिस्तानच्या या चुकीमुळे त्यांचा हा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला. इतक्या महत्त्वपूर्ण सामन्यात अशी चूक करणे हे पाकिस्तानी संघाने सामन्याला किती हलकेपणाने घेतले याचे द्योतक आहे. ही अशी चूक आहे, जी गल्लीत खेळणारी मुलेही करणार नाहीत.





