\n

पाक पहिला डाव…

\n

कसोटी मालिकेतील पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानला दुसरा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता, पण शान मसूदच्या संघाला तसे करता आले नाही. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचे फलंदाज फ्लॉप ठरले आणि पहिल्या डावात संघाला केवळ 274 धावाच करता आल्या. यादरम्यान पाकिस्तानकडून सॅम अयुबने 58 धावा, शान मसूदने 57 धावा आणि आगा सलमानने 54 धावा केल्या. तर बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने 5 बळी घेतले. याशिवाय तस्किन अहमदला 3 आणि शाकिब अल हसनला एक विकेट मिळाली.

\n

बांगलादेश पहिला डाव…

\n

यानंतर बांगलादेशची पहिल्या डावात खूपच खराब सुरुवात झाली. 26 च्या धावसंख्येवर केवळ 6 विकेट पडल्या होत्या, पण संघाने जबरदस्त झुंज दिली. लिटन दासने 138 धावा केल्या आणि गोलंदाजीत 5 विकेट घेणाऱ्या मेहंदी हसन मिराजने 78 धावांची खेळी करत आश्चर्यकारक कामगिरी केली. या दोघांच्या जोरावर बांगलादेशने 6 बाद 26 वरून पहिल्या डावात 262 धावा केल्या. ज्यामुळे पाकिस्तानला पहिल्या डावानंतर केवळ 12 धावांची आघाडी मिळाली.

\n

पाक दुसरा डाव…

\n

पहिल्या डावानंतर 12 धावांची नाममात्र आघाडी घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाला बांगलादेशने अवघ्या 172 धावांत गुंडाळले. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी केवळ 185 धावांचे लक्ष्य मिळाले होते. दुसऱ्या डावातही पाकचे प्रमुख फलंदाज अब्दुल्ला शफीक(03) , बाबर आझम (11), शान मसूद (28) आणि सौद शकील (02) हे सगळे फ्लॉप झाले. पाककडून आगा सलमानने नाबाद सर्वाधिक 47 तर रिझवानने 43 धावा केल्या. बांगलादेश संघाने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या सर्व 10 विकेट बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या होत्या. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. यादरम्यान वेगवान गोलंदाज हसन महमूदने पाच विकेट घेतल्या. नाहिद राणाने चार आणि तस्किन अहमदने एक विकेट घेतली.

\n

Paris Paralympics 2024 : भारताचे सर्वात यशस्वी 24 तास, ऐतिहासिक कामगिरीसह एका दिवसात जिंकली 8 पदके…

\n

\n

बांगलादेशचा दुसरा व निर्णायक असा डाव…

\n

चौथ्या दिवशी विजयासाठी 185 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या झाकीर हसन आणि शादमान इस्लाम यांनी बांगलादेशला झंझावाती सुरुवात करून दिली, मात्र पाऊस आणि खराब हवामान बांगलादेशच्या विजयात अडथळा ठरले. चौथ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा बांगलादेशने एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या होत्या आणि आता पाचव्या दिवशी इतिहास रचण्यासाठी बांगलादेशला आणखी 143 धावा करायच्या होत्या. खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरली होती, परंतु बांगलादेशने जबरदस्त उत्साह दाखवत केवळ चार विकेट्स गमावून लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग केला.

\n

सामन्याच्या पाचव्या दिवशी मुशफिकुर रहीम (22) आणि शकीब अल हसन (21) नाबाद माघारी परतले आणि आपल्या संघाला विजयाकडे नेले. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात झाकीर हसनने सर्वाधिक 40, शादमान इस्लामने 24, कर्णधार नझमुल हुसेन शांतोने 38 आणि मोमिनुल हकने 34 धावा केल्या. तर पाककडून दुसऱ्या डावात हमजा, शहजाद, अबरार आणि सलमानला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"PAK vs BAN : पाकचा दुसऱ्या सामन्यातही लाजीरवाणा पराभव, बांगलादेशचा 2-0 ने ऐतिहासिक कसोटी मालिका विजय…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/09/PAK.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pak-vs-ban-2nd-test-pakistan-vs-bangladesh-2nd-test-bangladesh-won-the-match-by-6-wickets-and-the-series-2-0#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/09/PAK.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/pak-vs-ban-2nd-test-pakistan-vs-bangladesh-2nd-test-bangladesh-won-the-match-by-6-wickets-and-the-series-2-0#webpage","name":"PAK vs BAN : पाकचा दुसऱ्या सामन्यातही लाजीरवाणा पराभव, बांगलादेशचा 2-0 ने ऐतिहासिक कसोटी मालिका विजय…","url":"https://www.dainikprabhat.com/pak-vs-ban-2nd-test-pakistan-vs-bangladesh-2nd-test-bangladesh-won-the-match-by-6-wickets-and-the-series-2-0","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pak-vs-ban-2nd-test-pakistan-vs-bangladesh-2nd-test-bangladesh-won-the-match-by-6-wickets-and-the-series-2-0#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/09/PAK.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/pak-vs-ban-2nd-test-pakistan-vs-bangladesh-2nd-test-bangladesh-won-the-match-by-6-wickets-and-the-series-2-0#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/pak-vs-ban-2nd-test-pakistan-vs-bangladesh-2nd-test-bangladesh-won-the-match-by-6-wickets-and-the-series-2-0","name":"PAK vs BAN : पाकचा दुसऱ्या सामन्यातही लाजीरवाणा पराभव, बांगलादेशचा 2-0 ने ऐतिहासिक कसोटी मालिका विजय…"}}]}}}

PAK vs BAN : पाकचा दुसऱ्या सामन्यातही लाजीरवाणा पराभव, बांगलादेशचा 2-0 ने ऐतिहासिक कसोटी मालिका विजय…