Pakistan vs Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत स्टार फलंदाज बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांचे पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पाकिस्तानी संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता, मात्र संघाने जोरदार पुनरागमन करत दुसरा आणि तिसरा सामना जिंकला आणि मालिकाही खिशात टाकली. ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या मालिकेनंतर पाक संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनने जानेवारी 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना केल्यानंतर एकदिवसीय संघात पुनरागमन केले आहे. फैसलाबाद येथील इक्बाल स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत 17 विकेट्स घेतल्याचा पुरस्कार या तरुण वेगवान गोलंदाजाला नुकताच मिळाला आहे.
संघात संधी देण्यात आलेल्या इतर नवीन खेळाडूंमध्ये अराफत मिन्हास, ओमेर बिन युसूफ, सुफियान मुकीम, फैसल अक्रम, अहमद दानियाल आणि जहंदाद खान यांचा समावेश आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एका निवेदनात म्हटले आहे की, निवडकर्त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी डोळ्यासमोर ठेवून या खेळाडूंची निवड केली आहे.
ते पुढे म्हणाले की, संघाने रोटेशन धोरणही डोळ्यासमोर ठेवले होते. पाकिस्तानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 4 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या एकदिवसीय सामन्याने होणार आहे. यानंतर संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाईल, जिथे 24 नोव्हेंबर रोजी बुलावायो येथे उभय संघांमधील पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाईल.
🚨 Announcing Pakistan’s squads for the Australia and Zimbabwe tours 🚨
Read more ➡️ https://t.co/vzc7iFBINJ#AUSvPAK | #ZIMvPAK pic.twitter.com/l66VW259EA
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2024
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तान संघ – आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफत मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हरिस रौफ, हसीबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह , सॅम अयुब, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ – अराफत मिन्हास, बाबर आझम, हारिस रौफ, हसिबुल्लाह, जहाँदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, ओमेर बिन युसूफ, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मोकीम, उस्मान खान.
SL vs WI 3rd ODI : वेस्ट इंडिजनं मालिका गमावली पण अखेरचा सामना गाजवला, श्रीलंकेचा केला दारूण पराभव…
दरम्यान, आश्चर्याची बाब म्हणजे पीसीबीने संघ जाहीर केला असला तरी कर्णधार कोण होणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. पीसीबीने कर्णधाराशिवाय दोन्ही (ऑस्ट्रेलिया,झिम्बाब्वे) मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. पीसीबीने एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इमाद वसीम आणि मोहम्मद आमिर यांना एकदिवसीय मालिकेत किंवा टी-20 मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही. पाकिस्तानला 4 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यानंतर 14 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.