Usman Tariq Controversy : चेंडू टाकतोय की दगड फेकतोय? पाकिस्तानी गोलंदाजावर ‘चिटिंग’चा आरोप; कॅमेरून केली नक्कल, पाहा VIDEO
Usman Tariq Controversy : पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज उस्मान तारिकच्या गोलंदाजीच्या अॅक्शनवरून वाद निर्माण झाला आहे.

Usman Tariq Controversy about bowling action : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या तोंडावर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिका कमालीची गाजत आहे. पाकिस्तानने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली असली, तरी दुसऱ्या सामन्यातील एका घटनेने क्रिकेट विश्वात मोठा वाद निर्माण केला आहे. पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिकच्या गोलंदाजी ॲक्शनवरून पुन्हा एकदा ‘चिटिंग’चे आरोप होत असून, ऑस्ट्रेलियन फलंदाज कॅमेरून ग्रीनने जाहीरपणे आपला संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियाच्या डावातील ११ व्या षटकात उस्मान तारिक गोलंदाजीला आला. यावेळी कॅमेरून ग्रीन आक्रमक फलंदाजी करत होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात ग्रीन बाद झाला. मात्र, बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना ग्रीनने सीमारेषेवर थांबून कोणाकडे तरी दगड फेकल्यासारखी नक्कल केली. ग्रीनची ही कृती थेट उस्मान तारिकच्या संशयास्पद गोलंदाजीच्या ॲक्शनकडे इशारा करणारी होती.
सोशल मीडियावर ‘चिटिंग’चे आरोप –
ग्रीनच्या या कृतीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी उस्मान तारिकवर टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी तारिक चेंडू फिरकावत नसून तो फेकत असल्याचा आरोप केला आहे. तारिकची ॲक्शन ही नेहमीच्या फिरकी गोलंदाजांसारखी नसून ती दिशाभूल करणारी असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
🚨🚨 Cameron Green called out Usman Tariq for chucking after getting out!!
– Tom Banton called out Usman Tariq for chucking in ILT2O.
– PSL banned him for chucking.
– Green tonight called him out for chucking.
Is ICC sleeping? How is he not banned?pic.twitter.com/8mSKViQzho
— Rajiv (@Rajiv1841) January 31, 2026
कशी आहे तारिकची गोलंदाजी ॲक्शन?
पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज उस्मान तारिकच्या गोलंदाजीच्या अॅक्शनवरून वाद
उस्मान तारिक हा उजव्या हाताचा ऑफ-ब्रेक गोलंदाज आहे. त्याची ॲक्शन थोडी वेगळी आहे. तो चेंडू टाकण्यापूर्वी क्षणभर थांबतो. यानंतर खांद्यावरून चेंडू न टाकता तो बाजूने हात फिरवून चेंडू सोडतो. ही पद्धत काहीशी लसिथ मलिंगा किंवा भारताच्या केदार जाधव आणि रियान पराग यांच्याशी मिळतीजुळती आहे. विशेष म्हणजे, तारिकच्या ॲक्शनची आयसीसीने (ICC) दोनदा तपासणी केली असून त्याला ‘क्लीन चीट’ मिळालेली आहे.
इन्स्टाग्रामवर दिले प्रत्युत्तर –
कॅमेरून ग्रीनने केलेल्या अपमानाचा उस्मान तारिकनेही वचपा काढला. सामन्यानंतर तारिकने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका रडणाऱ्या मुलाचा फोटो शेअर केला. यातून त्याने ग्रीनच्या ‘रडगाण्या’ची एकप्रकारे खिल्ली उडवल्याची चर्चा रंगली आहे.





