SL vs WI 3rd ODI : वेस्ट इंडिजनं मालिका गमावली पण अखेरचा सामना गाजवला, श्रीलंकेचा केला दारूण पराभव…

Sri Lanka vs West Indies 3rd ODI Highlights : वेस्ट इंडिजने तिसऱ्या वनडेत श्रीलंकेचा दारूण पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप टाळला. श्रीलंकेने पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली होती. टी-20 ची मजा मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत पाहायला मिळाली. वास्तविक, पावसामुळे सामना 23-23 षटकांचा खेळवण्यात आला.
पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी(दि.26) खेळल्या गेलेल्या सामन्यात, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली, त्यानंतर पावसाने हस्तक्षेप केला आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजला सुधारित लक्ष्य मिळाले. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
Despite a tough fight from the West Indies who took the 3rd ODI by 8 wickets (DLS method), the Lions roar to a series victory! We take the series 2-1! 🎉#SLvWI pic.twitter.com/Llz9BXSOBr
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 26, 2024
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने 23 षटकांत 3 बाद 156 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. त्याचवेळी पावसाने हस्तक्षेप केला, त्यानंतर वेस्ट इंडिजला 195 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. यादरम्यान पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी संघासाठी सर्वात मोठी खेळी करताना प्रत्येकी 56-56 धावा केल्या. मेंडिसने 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 254.55 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, तर निसांकाने 90 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. या काळात वेस्ट इंडिजकडून शेरफेन रदरफोर्ड आणि रोस्टन चेस यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
विजयासाठी 196 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने 22 षटकांत 2 बाद 196 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले आणि श्रीलंकेला 8 विकेट राखून पराभूत केलं. यादरम्यान, एविन लुईसने संघासाठी शानदार खेळी खेळली आणि 61 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 102 धावा केल्या. याशिवाय शेरफेन रदरफोर्डने 26 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 50 धावा करत संघास विजय संपादन करून दिला. लुईस आणि रदरफोर्ड यांनी तिसऱ्या विकेटसाठी 45 चेंडूत 88 धावांची अखंड भागीदारी केली आणि संघाला विजयाच्या पलीकडे नेले.
यादरम्यान श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो आणि दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. फर्नांडोने 5 षटकांत 39 धावा आणि मदुशंकाने 5 षटकांत 50 धावा दिल्या.

