PAK vs NZ 5th T20I : अखेरच्या सामन्यात पाकचा न्यूझीलंडवर विजय, मालिका 2-2 ने बरोबरीत…

लाहोर,दि.२८- पाकिस्तानने टी-20 मालिकेतील 5व्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा 9 धावांनी पराभव केला. यासह पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 278 धावा केल्या आणि न्यूझीलंडला 179 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात किवी संघ 19.2 षटकांत सर्वबाद 269 धावांत आटोपला. शाहीन शाह आफ्रिदी सामना आणि मालिका दोन्हीचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. या मालिकेत त्याने एकूण 8 विकेट घेतल्या.
The Bank Alfalah Presents Jazz Pakistan vs New Zealand T20I Series 2024 trophy is shared 🇵🇰🏆🇳🇿#PAKvNZ | #AaTenuMatchDikhawan pic.twitter.com/P8LBuhcQT2
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 27, 2024
कर्णधार बाबर आझमने पाकिस्तानसाठी शानदार फलंदाजी केली आणि त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 34 वे अर्धशतक झळकावले. बाबरने उस्मान खान (31) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची आणि फखर झमान (43) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली.
बाबर आपल्या डावात 44 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 69 धावा करून बाद झाला. न्यूझीलंडकडून झॅचरी फॉल्केस, विल्यम ओ’रुर्के, बेन सियर्स, इश सोधी आणि जेम्स नीशम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





