NZ vs PAK Demands PCB Chief Resignation : न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानचा पराभव केल्याने, शेजारील देशात घबराट पसरली. एका माजी दिग्गज यष्टीरक्षकाने तर पीसीबी प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कामरान अकमल इतका संतापला आहे की त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावर आपला राग काढला आहे. जर ते संघाची सध्याची स्थिती सुधारू शकत नसतील, तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे वक्तव्य केले आहे. कामरान अकमल पीसीबी अध्यक्षांवर संतापला – कामरान अकमलने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, ‘हे लज्जास्पद आहे. पीसीबी अध्यक्षांनी विचार करावा की जर ते नियंत्रण ठेवू शकत नसतील, तर त्यांनी राजीनामा देऊन निघून जावे. तुमची प्रतिष्ठा खराब करू नका. जर तुम्हाला हे करायचे नसेल तर सध्याच्या संघाची स्थिती सुधारा. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानच्या दारुण पराभवामुळे अकमल संतापला आहे. पाकिस्तानचा न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दारुण पराभव – मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने गमावले आहेत. दुसऱ्या सामन्यात त्यांना ८४ धावांनी पराभव पत्करावा लागला. एकदिवसीय मालिकेतील पराभवापूर्वी पाकिस्तानने टी-२० मालिकेतही खूपच खराब कामगिरी केली होती. त्याआधी, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही पाकिस्तानची कामगिरी खूपच खराब झाली होती. हेही वाचा – IPL 2025 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू अचानक मायदेश परतला कामराने अकमलने गोलंदाजांनाही खडसावले – न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानी गोलंदाजांच्या कामगिरीवरही अकमल निराश आहे. तो म्हणाला की, संघात नवीन चेहऱ्यांना स्थान देण्याची वेळ आली आहे. तो म्हणाला, ‘जर पाकिस्तानी गोलंदाज अशा मैदानावर गोलंदाजी करू शकत नसतील, तर ते कुठे गोलंदाजी करतील?’ आशियामध्ये ते म्हणतात की गोलंदाजांसाठी काहीही नाही. त्यांनी आपल्याविरुद्ध अपंग खेळाडूंना मैदानात उतरवावे का? आम्हाला चेंडू कुठे टाकायचा हे माहित नाही. याचा अर्थ बदल करायलाच हवेत.’