NZ vs PAK Floodlights Incident : सामन्यात चेंडू टाकताच बंद झाली लाईट, पाकिस्तानी फलंदाज क्रीज सोडून पळाला, VIDEO होतोय व्हायरल

NZ vs PAK 3rd ODI floodlights went off incident video viral : शनिवारी माउंट मौंगानुई येथे पावसामुळे व्यत्यय आलेल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ४३ धावांनी पराभव केला. यासह, न्यूझीलंडने टी-२० मालिकेनंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही जिंकली. न्यूझीलंडने टी-२० मालिकेत पाकिस्तानचा ४-१ असा पराभव केला. दरम्यान ओल्या मैदानामुळे तिसरा सामना ४२-४२ षटकांचा करण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज तय्यब ताहिर गंभीर दुखापत होण्यापासून थोडक्यात वाचला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लाईट अचानक बंद झाल्याने टळली मोठी दर्घटना –
पाकिस्तानच्या डावादरम्यान, स्टेडियममधील लाईट अचानक बंद झाली, ज्यामुळे स्ट्राईकवर असलेल्या ताहिरला अंधारात चेंडू खेळावा लागला. यावेळी चेंडू टाकल्यानंतर ताहिर ताबडतोब खेळपट्टीवरुन बाजूला पळाला. ज्यामुळे तो दुखापती होण्यापासून थोडक्यात वाचला. ही घटना पाकिस्तानच्या डावाच्या ३९ व्या षटकात, यावेळी जेकब डफी स्ट्राईकवर असलेल्या तय्यब ताहिरला गोलंदाजी करण्यासाठी वेगाने पुढे जात होता आणि त्याने चेंडू टाकताच स्टेडियमधील लाईट बंद झाली. त्यामुळे समालोचकही काही वेळ स्तब्ध राहिले.
Even Floodlight is playing with Pakistan team 😹😹 pic.twitter.com/eCDKFQm6uq
— Sandesh. (@Sandesh_2545) April 5, 2025
तय्यब ताहिरने खेळपट्टी सोडून काढला पळ –
Dramatic scenes at Bay Oval as the lights went out during the New Zealand vs Pakistan ODI, plunging the stadium into darkness and halting play. #PAKvNZ pic.twitter.com/ca5j2HI4rz
— Abdul Wasey Naik (@WaseyNaik) April 5, 2025
लाईट बंद झाल्यानंतर लगेचच, पाकिस्तानचा फलंदाज तय्यब ताहिर वेगाने क्रीजबाहेर गेला आणि चेंडू स्टंपवरून यष्टिरक्षकाकडे गेला. रिप्लेमध्ये चेंडू कुठे गेला हे दाखवता आले नाही, मात्र, यावेळी मोठी दुर्घटना टळली. कारण जर चेंडू फलंदाजाला किंवा कोणत्याही क्षेत्ररक्षकाला लागला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.
हेही वाचा – PBKS vs RR : राजस्थानचा सलग दुसरा ‘रॉयल’ विजय! आर्चरच्या वेगवान माऱ्यासमोर पंजाबने टेकले गुडघे
सामन्याबद्दल बोलायचे तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने ४२ षटकांत ८ गडी गमावून २६४ धावा केल्या. या संघासाठी मारियोने ६१ चेंडूत ५८ धावा केल्या आणि कर्णधार मायकेल ब्रेसवेलने ४० चेंडूत ५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तान संघ ४० षटकांत सर्व विकेट गमावून केवळ २२१ धावा करू शकला. पाकिस्तानकडून बाबर आझमने ५८ चेंडूत ५० धावा, कर्णधार रिझवानने ३७ धावा आणि ताहिरने ३३ धावांचे योगदान दिले.





