Khushdil Shah Fight : ‘…तर त्याने बॅटनं मारलं असतं’, खुशदिल शाहच्या भांडणावर बासित अलीचं मोठं वक्तव्य

NZ vs PAK Basit Ali Big Claim on Khushdil Shah fight : शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानचा व्हाईटवॉश झाला. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला ४३ धावांनी पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीसोबतच खुशदिल शाहच्या वादाचीही बरीच चर्चा होत आहे. खरं तर, खुशदिल शेवटच्या एकदिवसीय सामन्यात अफगाण वंशाच्या प्रेक्षकांशी वाद घालताना दिसला. तो प्रेक्षकांना मारण्यासाठीही धावला. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण शांत झाले. या वादावर आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने मोठं वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू बासित अली म्हणाला की, प्रेक्षकांनी शिवीगाळ केली होती, त्यानंतर खुशदिल संतापला. कोणताही खेळाडू असो तो आपल्या देशाबद्दल अपशब्द ऐकून घेऊ शकत नाही. या प्रकरणात तेच झाले. सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी केली म्हणून बरं झालं, नाही तर खुशदिल त्या अफगाण प्रेशकाला बॅटनं मारलं असतं. विशेष म्हणजे ३० वर्षीय पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू खुशदिलला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
बासित अली काय म्हणाला?
Pakistan's #KhushdilShah Fumes Over Fan Abuses; Jumps Barricade To Attack Spectators Tensions boiled over after #Pakistan’s crushing 3-0 ODI series loss to New Zealand, as all-rounder Khushdil Shah was involved in a heated exchange with two Afghan spectators #PAKvsNZ #NZvPAK pic.twitter.com/lQpYtqvTby
— Gurpreet singh gill (@IGsgill) April 5, 2025
रविवारी बासित अलीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, “खुशदिल प्रकरणावर मिळालेल्या माहितीनुसार, दोन पठाण एकमेकांशी भिडले. कारण प्रेक्षक खेळाडूंना शिवीगाळ करत होते आणि सर्वजण शांत बसले होते. खुशदिल सामना खेळला नव्हता म्हणून तो रागावला होता. तो एक रागीट माणूस आहे. अफगाणी पठाणाने जेव्हा पाकिस्तानला शिवीगाळ केली, तेव्हा त्यानीही प्रत्युत्तर दिले.”
हेही वाचा – Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज! जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होऊन संघात दाखल
‘खुशदिल शाहने बॅटनं मारलं असतं’ – बासित अली
बासित अली पुढे म्हणाला, “सामान्यतः चाहते असे करतात आणि एक क्रिकेटपटू म्हणून ते सहन केले जात नाही. बरं झालं सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करुन प्रकरण लवकर मिटवलं, नाही तर खुशदिल असा माणूस आहे, ज्याने त्या प्रेक्षकाला बॅटनं मारलं असतं. कारण त्याला त्याच्या कारकिर्दीची पर्वा नाही. ही एक साधी बाब आहे की जेव्हा आपल्या देशाचा प्रश्न येतो. तेव्हा कोणीही गप्प बसणार नाही. तुम्ही खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोला, पण देशाबद्दल बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही.”
हेही वाचा – PBKS vs RR : पंजाबला हरवणाऱ्या राजस्थानच्या खेळाडूला प्रीती झिंटाने मारली मिठी, VIDEO होतोय व्हायरल
पीसीबीने निवेदनात काय म्हटलं?
माउंट मौंगानुई येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान अफगाण प्रेक्षकांच्या एका गटाने पाकिस्तानी खेळाडूंविरुद्ध केलेल्या अनुचित टिप्पणीचा पीसीबीनेतीव्र निषेध केला. पाकिस्तानी संघाच्या तक्रारीनंतर अफगाण वंशाच्या दोन प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकलून लावण्यात आले. “जेव्हा पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या तेव्हा क्रिकेटपटू खुशदिल शाह यांनी हस्तक्षेप केला आणि प्रेक्षकांना असे न करण्याचे आवाहन केले,” असे पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे.





