“इथूनच दहशतवाद्यांचा उगम झाला…” ; लष्कर कमांडरने ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल दिली मोठी कबुली

Operation Sindoor। ऑपरेशन सिंदूरमुळे झालेल्या नुकसानीबद्दल पाकिस्तान सत्य लपवत आहे, परंतु अलीकडेच, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी याने पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. मुरीदके याठिकाणी नुकसानीचे वर्णन करणारा लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवाद्याचा व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय सैन्याने मुरीदकेमधील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला. आता, त्या जागेची पुनर्बांधणी सुरू आहे. असे म्हणत लष्कर कमांडरने पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे.
पाकिस्तानच्या खोट्या गोष्टी उघड करणारा लष्कर कमांडर कासिमचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कासिम याने, “मी सध्या मुरीदके येथील मरकझ-ए-तैयबा छावणीसमोर उभा आहे, जो ऑपरेशन सिंदूर दरम्यान नष्ट झाला होता. त्याची पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही मशीद पूर्वीपेक्षा खूप मोठी असेल.” “येथून अनेक प्रमुख मुजाहिदीन उदयास आले आहेत.”असे म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये एक नवीन दहशतवादी कारखाना Operation Sindoor।
व्हिडिओमध्ये कासिमने नष्ट झालेला मरकझ-ए-तैयबा कॅम्प दाखवला, जो आता उद्ध्वस्त झाला होता. त्याने असेही उघड केले की याच ठिकाणी अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे, कासिमने एक नवीन ठिकाण देखील उघड केले जे दहशतवादी कारखाना बनण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये कासिम म्हणाला, “आज १५ सप्टेंबर आहे. पाकिस्तानमधील हे एकमेव ठिकाण आहे जिथे दौरा-ए-सुफ्फा नावाचा कोर्स शिकवला जातो. या अंतर्गत दहशतवाद्यांना घोडेस्वारी, पोहणे आणि इतर अनेक कौशल्ये शिकवली जातात.”
लष्कर आणि जैशची नवीन दहशतवाद्यांची भरती Operation Sindoor।
लश्कर आणि जैशच्या कमांडरनी नवीन दहशतवाद्यांची भरती करण्यास सुरुवात केली आहे. या उद्देशाने, त्यांनी प्रशिक्षण शिबिरे देखील उभारली आहेत जिथे त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या काळात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले. पाकिस्तान या दहशतवाद्यांना लपवत आहे.





