Omraje Nimbalkar : अखेर ओमराजेंनी निर्णय घेतलाच; कार्यकर्त्यांच्या बैठकीतील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल
Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या 'गोवर्धनवाडी' येथील निवासस्थानी पार पडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अंतर्गत बैठकीतील एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतील एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ओमराजे निंबाळकर सत्तेसोबत जाण्याची गरज व्यक्त करताना ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. (Omraje Nimbalkar)
‘सत्तेतील नेतृत्व स्वीकारावं लागेल’
व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ओमराजे निंबाळकर म्हणत असल्याचा दावा आहे की, मतदारसंघाच्या विकासासाठी आणि लोकांची कामे करण्यासाठी निधी आवश्यक आहे, त्यामुळे सत्तेतील नेतृत्व स्वीकारावं लागेल. (Omraje Nimbalkar)
तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विषयाची दखल घेतल्याचा उल्लेख करत, “मी काही निर्णय घेणार आहे. त्या निर्णयाच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी उभे राहा,” असेही ते कार्यकर्त्यांना सांगत असल्याचे या कथित क्लिपमध्ये ऐकू येत असल्याचा दावा आहे. (Omraje Nimbalkar)
Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे नेमके कोणासोबत? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? सर्वात मोठी माहिती समोर
‘प्रतिमा घडवायला आलो नाही’
या कथित ऑडिओमध्ये ओमराजे निंबाळकर म्हणत असल्याचा दावा आहे की, “मी खासदार म्हणून माझी प्रतिमा घडवायला आलो नाही. निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा झाली आहे. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यासाठी नाही, तर त्यांच्या उरावर बसण्यासाठी आलो आहे,” असेही त्यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे. (Omraje Nimbalkar)
कार्यकर्त्यांचा सत्तेत जाण्याचा आग्रह
बैठकीपूर्वी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेत सहभागी व्हावे, अशी भूमिका मांडली होती. काही कार्यकर्त्यांनी त्यांना भविष्यात मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. (Omraje Nimbalkar)






