Old Kasara Ghat : जुना कसारा घाट 6 दिवस राहणार बंद

ठाणे : नाशिक-मुंबई महामार्गावरील जुना कसारा घाट उद्या, सोमवारपासून पुढील सहा दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात पुढील 6 दिवस जुना कसारा घाट बंद असणार आहे.
सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार असून सोमवार (दि. 24) ते गुरुवार (दि. 27) या दरम्यान तसेच 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीत जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती आणि पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार आहे.
या दरम्यान नाशिक दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक-मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रासाला समोरे जावे लागणार आहे. तसेच, जुन्या कसारा घाटातील डोकावणाऱ्या दरडी, जुनी महाकाय वृक्ष देखील या कालावधीत काढली जाणार आहेत.




