Manipur Schools Closed : मणिपूरमधील शाळा बेमुदत काळासाठी बंद
Updated On:

इंफाळ : अशांत स्थिती असणाऱ्या मणिपूरमधील काही जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मणिपूरमध्ये काही दिवसांपूर्वी हिंसक निदर्शने झाली.
त्यामुळे त्या राज्यातील काही जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली. तेथील शाळा आणि महाविद्यालये १६ नोव्हेंबरपासून बंद ठेवण्यात आली. तो निर्णय आणखी काही काळ लागू राहणार असल्याचे राज्य सरकारने मंगळवारी जाहीर केले.
मणिपूरमध्ये अलिकडच्या काळात कुठली अनुचित घटना घडलेली नाही. त्या राज्यात तणावपूर्ण शांतता आहे. स्थानिकांना जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची खरेदी करता यावी यासाठी दिवसातील काही तास संचारबंदी शिथिल केली जाते.




