Political News : राजकारणात मोठा भूकंप! तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या दिग्गज नेत्याचा सत्ताधारी पक्षात प्रवेश
Political News : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम (OPS) यांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सत्ताधारी द्रमुक (DMK) पक्षात प्रवेश केला आहे.

Political News : २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि जयललितांच्या निकटवर्तीय नेते ओ. पनीरसेल्वम यांनी आज (२७ फेब्रुवारी) सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कझगम (DMK) पक्षात प्रवेश केला.
मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्या उपस्थितीत अण्णा अरिवलयम येथे त्यांचे पक्षात औपचारिक स्वागत झाले. उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांच्यासह इतर नेत्यांनीही त्यांचे स्वागत केले.
पनीरसेल्वम यांची राजकीय पार्श्वभूमी (Political News)
ओ. पनीरसेल्वम (वय ७५) हे अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम (AIADMK) पक्षाचे माजी समन्वयक होते. जयललितांच्या काळात ते त्यांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जात होते. त्यांनी तीन वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.
२००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, पण केवळ ६ महिन्यांत राजीनामा द्यावा लागला. २०१४ मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, पण फक्त एक महिना टिकले. २०१६-२०१७ मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, पण अल्पकाळीन कारकीर्द राहिली आणि २०१७ मध्ये राजीनामा दिला.
முன்னாள் முதலமைச்சரும் அருமைச் சகோதரருமான திரு. ஓ.பன்னீர்செல்வம் அவர்கள் தாய்க்கழகமாம் திராவிட முன்னேற்றக் கழகத்தில் இணைந்துள்ளார். அவரை வருக வருக என வரவேற்கிறேன்.
திராவிட இயக்கத்தின் மாபெரும் தலைவரின் பெயரைத் தாங்கிய அவர் திராவிட இயக்கக் கொள்கை காக்கும் நம் பேரியக்கத்தில்… pic.twitter.com/I2YoNAxgis
— M.K.Stalin – தமிழ்நாட்டை தலைகுனிய விடமாட்டேன் (@mkstalin) February 27, 2026
जयललितांच्या निधनानंतर (२०१६) OPS आणि एडाप्पाडी के. पलानीस्वामी (EPS) यांच्यात पक्ष नेतृत्वावरून दीर्घ संघर्ष झाला. अखेरीस २०२२ मध्ये OPS यांची AIADMK मधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पक्षात परतण्याचे प्रयत्न केले, पण EPS ने नकार दिला. अलीकडेच EPS यांनी TTV धिनाकरन यांना NDA मध्ये सामील केल्याने OPS यांनी DMK कडे वळण घेतले.
OPS यांनी प्रवेशानंतर सांगितले की, “स्टालिन चांगले प्रशासन देत आहेत. लोक ते पाहत आहेत. EPS दक्षिणेकडील नेत्यांना मजबूत होऊ देत नाहीत. द्रविडियन चळवळ आणि धोरण वाचवण्यासाठी DMK कार्यरत आहे. मी फक्त एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सामील झालो आहे आणि पक्षाच्या विकासासाठी काम करेन.” ते म्हणाले, “मी स्टालिन यांच्या नेतृत्वाला मान्यता देतो.”





