IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटी सामन्यादरम्यान पावसाची शक्यता किती? जाणून घ्या, हवामान अहवाल…

India vs New Zealand 2nd Test Weather Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये विजयाच्या शोधात आहे.
बंगळुरू कसोटीत पावसाने सामन्याची मजा कशी बिघडवली हे पाहायला मिळाले. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. त्यामुळे टीम इंडियाचेही नुकसान झाले. पुणे कसोटीत पाऊस ‘खलनायक’ ठरू शकतो, असा प्रश्न आता चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे.
सर्वांच्या नजरा हवामानाकडे लागल्या आहेत. याचे एक कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी पुण्यात पाऊस पडला आहे. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी दिवसभर वातावरण चांगले होते आणि दोन्ही संघांनी सराव केला पण रात्री मुसळधार पाऊस झाला. अशा परिस्थितीत प्रत्येकजण काहीसा चिंतेत आहे. तथापि, बुधवारी देखील हवामान चांगले राहिल्याने भारत आणि न्यूझीलंडने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सराव केला. गुरुवारीही हीच परिस्थिती कायम राहण्याची अपेक्षा आहे आणि ही दिलासादायक बाब आहे.
उद्या असे राहील पुण्यातील हवामान…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात सुरू होणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 24 ऑक्टोबर रोजी पुण्याचे हवामान स्वच्छ राहणार आहे. तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याशिवाय पावसाची शक्यता नाही. अशा परिस्थितीत चाहत्यांना यावेळी संपूर्ण सामना बघायला मिळू शकतो. पुण्यात मात्र अंशत: ढगाळ वातावरण राहील.
एक्यूवेदर (Accuweather) च्या अंदाजानुसार, गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात पावसाची शक्यता नाही. तथापि, सकाळपासून हलके ढग असतील आणि सूर्यप्रकाशही असेल, परंतु पावसाचा एक थेंबही पडण्याची शक्यता नाही, शुक्रवार, 25 ऑक्टोबरला, म्हणजे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हवामान असेच राहण्याची शक्यता आहे. एकंदरच 5 दिवसांत पावसाची शक्यता नसल्याने सामन्यादरम्यान पावसामुळे कोणताही अडथळा येणार नाही. यामुळे सामना अडथळ्याशिवाय पार पडेल हे स्पष्ट झाले आहे.
Preps ✅#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/weLvxH9oRC
— BCCI (@BCCI) October 22, 2024
भारताच्या Playing 11 होऊ शकतो बदल…
पुणे कसोटीत टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. एकीकडे शुभमन गिल दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे, तर दुसरीकडे मोहम्मद सिराजला खराब कामगिरीमुळे प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. केएल राहुलही या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राहुल सतत खराब फॉर्ममधून जात आहे.
IND vs NZ 2nd Test : मोहम्मद सिराजला पुणे कसोटीतून मिळू शकतो डच्चू; जाणून घ्या, नेमकं कारण…
टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर…
बेंगळुरू कसोटीतील पराभवानंतर टीम इंडिया आता तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाची फलंदाजी खूपच खराब झाली होती. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 46 रन्सवर ऑलआऊट झाली होती. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले, पण संघाला विजय मिळवता आला नाही.





