आरजीआयटीबीटी महाविद्यालयाचा एनएसएस कॅम्प शिंदेवाडीत, विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला गाव परिसर
Updated On:

पुणे- भारती विद्यापीठ राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ आय.टी. ॲण्ड बायोटेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत जनजागृती अभियान राबविण्यात आले. हे शिबीर भोर तालूक्यातील शिंदेवाडी येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी श्रमदाना अंतर्गत वाघजाई माता मंदिर, ग्राम पंचायत कार्यालय परिसरात ५० विद्यार्थ्यांच्या गटाने स्वच्छता केली. शिबीरात प्राचार्य डॉ. शमीम ए. शेख, उप प्राचार्य डॉ. ई.ए.सिंग, प्राध्यापक डॉ.राखी डांगी, पूनम शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक एन.जे. यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले.





