Wimbledon 2025 : सेमीफायनलमधील पराभवानंतर जोकोविचचे दुखावले मन, निवृत्तीबद्दल केलं मोठं विधान

Novak Djokovic statement on his retirement : सर्बियाचा महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा विम्बल्डन 2025 मधील प्रवास संपला आहे. सेमीफायनल सामन्यात त्याला इटलीच्या यानिक सिनरकडून पराभव स्वीकारावा लागला. यानिक सिनरने या सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आणि सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळवला. या संस्मरणीय विजयासह सिनरने विम्बल्डन 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, जिथे त्याची गाठ स्पेनच्या कार्लोस अल्काराझशी होईल.
वर्षातील तिसरा सेमीफायनल सामना गमावला –
या पराभवानंतर चर्चा होती की हा जोकोविचचा शेवटचा विम्बल्डन सामना असू शकतो. मात्र, जोकोविचने स्वतः एक मोठे वक्तव्य केले आहे, ते काय आहे? जाणून घेऊया. नोव्हाक जोकोविच यंदा तीन ग्रँड स्लॅमच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचला, पण एकदाही पुढे जाऊ शकला नाही. विम्बल्डन 2025 मध्ये त्याला यानिक सिनरच्या रूपाने कठीण आव्हानाचा सामना करावा लागला. सिनर सध्या जागतिक क्रमवारीत नंबर वन खेळाडू आहे.
नोव्हाक जोकोविच निवृत्तीबद्दल काय म्हणाला?
🚨Novak Djokovic has announced he will be back at Wimbledon.
“I am not planning to finish my Wimbledon career today. I am planning to come back definitely at least one more time.”
The greatest of all time is here to stay. ❤️#NovakDjokovic #wimbledon #GOAT #Tennis 🎾 pic.twitter.com/JwFjG3SuhW
— Audrin Van Schoor (@audas_vanschoor) July 11, 2025
एक तास 55 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिनरने 6-3, 6-3, 6-4 अशा फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. सिनरसाठी विम्बल्डनची ही पहिलीच अंतिम फेरी आहे आणि यावेळी तो अल्काराझविरुद्ध पूर्ण ताकदीने उतरेल. नोव्हाक जोकोविचचा या स्पर्धेतील प्रवास संपला असला, तरी सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे: हा त्याचा शेवटचा विम्बल्डन सामना होता का? निवृत्तीच्या चर्चांदरम्यान जोकोविचने सामन्यानंतर स्पष्ट केले की त्याचा प्रवास अजून संपलेला नाही. तो म्हणाला “मी माझे विम्बल्डन करिअर संपवण्याचा कोणताही विचार करत नाही. मी पुन्हा येथे परत येऊ इच्छितो.”
हेही वाचा – Wimbledon 2025 Final : सिनरने सेमीफायनलमध्ये मारली बाजी! जोकोविचचा धुव्वा उडवत फायनलमध्ये मारली एन्ट्री
अल्काराझला हरवणं सिनरसाठी सोपं नसेल –
विम्बल्डन 2025 चं विजेतेपद मिळवण्यासाठी यानिक सिनरचा सामना आता कार्लोस अल्काराझशी होणार आहे. अल्काराझला पराभूत करणं सिनरसाठी अजिबात सोपं नसेल, कारण अल्काराझ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने सेमीफायनलमध्ये टेलर फ्रिट्जला हरवलं होतं. सिनरने आतापर्यंत पाच ग्रँडस्लॅम जिंकले आहेत, ज्यात विम्बल्डन ओपन (2023, 2024) यूएस ओपन (2022) आणि फ्रेंच ओपन (2024, 2025) यांचा समावेश आहे.





