Wimbledon 2025 Final : सिनरने सेमीफायनलमध्ये मारली बाजी! जोकोविचचा धुव्वा उडवत फायनलमध्ये मारली एन्ट्री

Wimbledon 2025 Final Alcaraz vs Sinner Updates : विम्बल्डन 2025 च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उपांत्य फेरीत इटलीचा खेळाडू यानिक सिनरने नोव्हाक जोकोविचला पराभूत केले, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत स्पेनचा कार्लोस अल्काराझने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला हरवले. आता रविवारी होणाऱ्या विम्बल्डन 2025 च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात गतविजेता कार्लोस अल्काराझ आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा खेळाडू यानिक सिनर यांच्यात लढत होईल. सिनर प्रथमच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
सिनरने जोकोविवर केली मात –
23 वर्षीय यानिक सिनरने 38 वर्षीय नोव्हाक जोकोविचला 6-3, 6-3, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना फक्त 1 तास 55 मिनिटे चालला. सिनरने सामन्यात 36 आकर्षक फटके (विनर्स) मारले, 12 ऐस लगावले आणि केवळ 2 डबल फॉल्ट केले. सर्व्हिस करताना त्याने पहिल्या सर्व्हिसवर 81% आणि दुसऱ्या सर्व्हिसवर 63% गुण जिंकले. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या सिनरने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले आणि विजयासह अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
Carlos Alcaraz. Jannik Sinner.
The gentlemen’s singles final will be box office 🍿#Wimbledon pic.twitter.com/Y551cJsLSb
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2025
सिनर 2018 नंतर विम्बलडनमध्ये जोकोविचला हरवणारा दुसरा खेळाडू –
विम्बल्डनपूर्वी सिनर आणि जोकोविच यांच्यातील थेट लढतीचा रेकॉर्ड 5-3 असा होता, ज्यामध्ये सिनरने अलीकडील सामन्यात विजय मिळवला होता. यानिक सिनरने 2018 नंतर विम्बलडनमध्ये नोव्हाक जोकोविचला हरवणारा कार्लोस अल्काराझनंतरचा दुसरा खेळाडू बनण्याचा मान मिळवला. नोव्हाक जोकोविचने सात वेळा विम्बलडनचे जेतेपद पटकावले आहे. त्याने पहिल्यांदा 2011 मध्ये ही प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली, तर 2022 मध्ये त्याने शेवटचे हे जेतेपद मिळवले.
हेही वाचा – IND vs ENG : जो रूटने केला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! कसोटी क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा बनला पहिलाच खेळाडू
अल्काराझ सलग तिसऱ्यांदा विम्बलडन फायनलमध्ये –
It’s been a pleasure to watch your tennis at #Wimbledon this year, Novak 👏
Congratulations on your run at The Championships 2025 ✨ pic.twitter.com/nnjteBGoKk
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2025
22 वर्षीय कार्लोस अल्काराझने टेलर फ्रिट्झला हरवून सलग तिसऱ्यांदा विम्बलडन फायनलमध्ये प्रवेश मिळवला. दोन वेळा चॅम्पियन असलेल्या अल्काराझने जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या टेलर फ्रिट्झला चार सेट्समध्ये 6-4, 5-7, 6-3, 7-6(6) अशा फरकाने पराभव करून हा पराक्रम केला. हा त्याचा विम्बलडनमधील सलग 20 वा विजय आहे.
हेही वाचा – Curtis Campher : आयर्लंडच्या कॅम्फरचा मोठा धमाका! सलग पाच चेंडूंत ५ विकेट्स घेत रचला इतिहास, पाहा VIDEO
त्याने 2021 पासून विम्बल्डनमध्ये कोणत्याही टॉप-5 खेळाडूविरुद्ध पराभव पत्करलेला नाही. 2021 मध्ये, जेव्हा तो फक्त 18 वर्षांचा होता आणि जागतिक क्रमवारीत 75व्या स्थानावर होता, तेव्हा त्याने पहिल्यांदा विम्बल्डन खेळला. आता, चार वर्षांनंतर, त्याने सेमीफायनलमध्ये 6-4, 5-7, 6-3, 7-6(8) अशा स्कोअरने विजय मिळवला आणि सलग तिसऱ्यांदा विम्बल्डनच्या फायनलमध्ये प्रवेश केला.





