Nordea Open 2024 : बोर्जेसनं पटकावले विजेतेपद, अंतिम फेरीत नदालला दिला पराभवाचा धक्का…

Nordea Open 2024 : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालला मोठा धक्का बसला आहे. नॉर्डिया ओपनच्या अंतिम सामन्यात त्याला नूनो बोर्जेसकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. सातव्या मानांकित पोर्तुगीज खेळाडूने अनुभवी स्पॅनिश खेळाडूचा 6-3, 6-2 असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले आहे.
राफेल नदालने शनिवारी उपांत्य फेरीच्या लढतीत दुजे अजदुकोविचचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव करून 2022 फ्रेंच ओपननंतर पहिल्यादाच मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.मात्र, त्याला यश मिळाले नाही.
🏆💙 The moment that made Nuno a Nordea Open champion!!#nordeaopen #båstad #tennis #atp
🎥 @atptour pic.twitter.com/hlKHafNOsc
— Nordea Open (@NordeaOpen) July 21, 2024
विजयानंतर बोर्जेस काय म्हणाला?
एकतर्फी विजयानंतर बोर्गेस म्हणाला, “हे विलक्षण आहे, टेनिसमध्ये कधी कधी अशा गोष्टी घडतात ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते. मला माहित आहे की, येथे सर्वांची इच्छा होती की नदालनेच जिंकावे, माझ्यातील एका मनालाही तेच हवे होते, परंतु माझ्यातील दुसरे मन काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा देत होते आणि त्यामुळेच मी यश मिळवू शकलो. ”
Paris Olympics 2024 : बॉक्सिंगमध्ये लोवोलिना-निखतवर असणार भारताची मुख्य मदार…
वयाच्या 19 व्या वर्षी पटकावले होते विजेतेपद…
38 वर्षीय नदाल 2022 च्या फ्रेंच ओपननंतर प्रथमच एटीपी टूरवरील स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तो पॅरिसमधील रोलँड गॅरोस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची तयारी करत आहे. नदालने विम्बल्डनमध्ये भाग घेतला नव्हता, कारण गेल्या दीड वर्षांपासून तो हिप आणि पोटाच्या दुखापतीने त्रस्त आहे. नदालने 2005 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी नॉर्डिया ओपनचे विजेतेपद पटकावले होते, त्यानंतर प्रथमच त्याने नॉर्डिया ओपन 2024 मध्ये सहभाग घेतला होता.





