Poll code violation : जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

बरेली – ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्या विरोधात उत्तरप्रदेशातील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. देशात 2019 या वर्षी झालेल्या मागील लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
त्यावरून त्यांच्या विरोधात दोन पोलीस ठाण्यांत दोन गुन्हे नोंदवण्यात आले. त्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत असल्याबद्दल जयाप्रदा यांच्या विरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले.
ED : माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांची 55 कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई
पुढील सुनावणी नव्या वर्षात 9 जानेवारीला होईल. समाजवादी पक्षाच्या (सप) माजी खासदार असणाऱ्या जयाप्रदा यांनी मागील लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी उत्तरप्रदेशच्या रामपूरमधून मागील निवडणूक लढवली. पण, सपचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी त्यांचा पराभव केला.





