नवी दिल्ली – द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांची तब्बल 55 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुरूवारी ही कारवाई केली.
तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या अर्थात डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये राजा हे केंद्रीय मंत्री होती. त्यावेळी त्यांच्या खात्याशी संबंधित 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रचंड गाजला होता व त्यात राजा यांना तुरूंगवारीही करावी लागली होती.
राजा यांचा हा कथित घोटाळा आणि कोळसा घोटाळा या दोन प्रकरणांमुळे युपीए सरकारच्या विरोधात नाराजीचे मोहोळ उठले होते व त्यातूनच त्या आघाडीला सरकार गमवावे लागले.
आता राजा यांच्या विरोधात नक्की कोणत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे, तसेच कोणत्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत त्याचा तपशील लगेचच उपलब्ध होऊ शकलेला नाही.