पुणे जिल्हा | पक्षातील निष्ठावंतांना उमेदवारी द्या

वाघोली, (प्रतिनिधी) – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकार्यांची वाघोली येथे बैठक पार पडली.
यावेळी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, असा ठराव सर्वांनी एकमताने केला व तसेच कोणत्याही परिस्थितीत अन्य पक्षातील इच्छुक उमेदवार आयात करू नये, असे पत्रही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात येणार आहे.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांची यादीत आयात उमेदवारांची भर नको, असा सूर या सभेत होता. निष्ठावंतांना संधी मिळावी ही प्रामाणिक इच्छा या सभेमागील होती. राष्ट्रवादीचा हा मेळावा पक्ष नेतृत्वाला वेगळा संदेश देऊन गेल्याची चर्चा हवेलीत वार्यासारखी पसरली आहे.
याप्रसंगी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन दादा पाटीलफराटे, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक शांताराम बापू कटके, माजी संचालक बाबासाहेब फराटे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी काळे,
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र कोरेकर, महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब सातव सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते चंदनजी सोंडेकर,
कोलवडी सरपंच विनायक गायकवाड, दिलीप गाडेकर, रोहिदास टिळेकर, प्रसाद कांचन, सुनील कांचन, गणेश झुरुंगे, हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा चारुशीला कांचन, हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष उत्कर्षा गोते,
माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना कटके, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्योती थोरात, रंजिता गाढवे, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुशाल सातव पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष जयेश कंद,
हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष युवराज काळभोर, सागर खंडागळे, जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्ष गुरमीत सिंग गिल, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय वीर, राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलचे तालुका अध्यक्ष किरण वाळके, राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुका अध्यक्ष तात्यासाहेब वाळके,
हवेली तालुका सहकार आघाडीचे अध्यक्ष अमर आबा गायकवाड, पुणे जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष प्रवीण आव्हाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष करण थोरात,
हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पंडित कोलते, विक्रम वाघमारे, सुजित दळवी, स्वप्निल काळभोर, सहदेव शिवले, सिद्धेश्वर काळभोर, रमेश काळभोर, तसेच शिरूर हवेली मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





