India-China face-off : तवांग चकमकीवर दलाई लामा यांची प्रतिक्रिया, म्हणाले “मला भारत आवडतो,चीनला परतण्याचा…”

कांगडा (हिमाचल प्रदेश) – अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चिनी सैनिक आमनेसामने आल्याच्या अलीकडच्या घडामोडींवर दलाई लामा यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. (No point in returning to China, I prefer India, says Dalai Lama after Tawang border face-off) जेव्हा दलाई लामा यांना तवांग वादाच्या संदर्भात चीनला दिलेल्या त्यांच्या संदेशाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, गोष्टी सुधारत आहेत. युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये चीन अधिक लवचिक आहे. पण, चीनमध्ये परत जाण्यात अर्थ नाही. मला भारत आवडतो. कांगडा हे नेहरुंप्रमाणेच माझ्या पसंतीचे कायमचे निवासस्थान आहे.
तवांगमधील हिंसक संघर्षानंतर प्रसिद्ध तवांग मठातील भिक्षूंनी चीनला इशारा दिला आहे की, हे 1962 नाही, हे 2022 आहे आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आहे. तवांग मठाचे साधू लामा येशी खावो म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाही सोडणार नाहीत. आम्ही मोदी सरकार आणि भारतीय सैन्याला पाठिंबा देतो.
लामा येशी खावो म्हणाले की, चीनची नजर भारतीय भूमीवरही आहे. चीन सरकार चुकीचे आहे. त्यांना जगात शांतता हवी असेल तर त्यांनी हे करू नये. त्यांना खरोखर शांतता हवी असेल तर त्यांनी कोणाचेही नुकसान करू नये. लामा येशी म्हणाले की, त्यांचा सध्याचे भारत सरकार आणि भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास आहे, ज्यामुळे तवांग सुरक्षित राहील.
Karnataka Politics : कर्नाटक विधानसभेत वीर सावरकरांचा फोटो लावल्यावरुन वाद
चीन सरकारने तिबेटची जमीन ताब्यात घेतली होती. तवांग मठाचे भिक्षू येशी खावो म्हणाले की, 1962 च्या युद्धात या मठातील भिक्षूंनी भारतीय सैन्याला मदत केली होती. चिनी सैन्यही मठात घुसले, पण त्यांनी कोणालाही दुखापत केली नाही. तवांग हा देखील तिबेटचा भाग असल्याचा दावा चीन सरकार करत आहे. पण, तवांग हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारतीय लष्कर सीमेवर आहे आणि आम्ही येथे शांततेने जगत आहोत.





