“आमचाही हात कोणीही बांधला नाही, यापुढे हल्ला कराल तर…”

मुंबई – उदयपूरमधील टेलर कन्हैयालालची हत्या होण्याच्या बरोबर एक आठवडापूर्वी अमरावतीमधील उमेश कोल्हे या 54 वर्षांच्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये एका हिंदू तरुणावर काही मुस्लिम तरुणांनी हल्ला केल्याचा दावा भाजपचे नितेश राणे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था NIA करत आहे. भाजपने कधीही नुपूर शर्मा यांचे समर्थन केलेले नाही. मात्र, त्यानंतर कोल्हेंची हत्या करण्यात आली. 4 ऑगस्टला पुन्हा एकदा हाच प्रयत्न कर्जत (अहमदनगर) येथे झाला. प्रतिक पवार या जवानाला 10-12 मुस्लिम तरुणांनी धमकावले आणि त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात कोयते होते. तसेच त्यांनी प्रतीक पवार या तरुणाला सांगितले की, “तु नुपूर शर्माचा डिपी ठेवला. आज प्रतिक पवार मृत्यूशी झुंज देतो आहे. त्याला 35 टाके पडले आहेत”, असे नितेश राणे म्हणाले.
यानंतर आक्रमक होत त्यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर देश चालतो. आमचाही हात कोणीही बांधला नाही. त्यामुळे यापुढे हल्ला कराल तर लक्षात ठेवा”, असा इशारा त्यांनी केला. तसेच तेथील स्थानिक पोलीस अधिकारी ही केस दाबण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा काही जणांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्यानंतर FIR दाखल करण्यात आला, असा दावाही नितेश राणे यांनी केला. तर काहीजण अजूनही फरार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच संबंधित व्यक्तीवर कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
धक्कादायक! मदरशामध्ये शिक्षकांकडून अमानुष मारहाण; कंटाळून पाच मुलांचे पलायन





