तालिबान सरकारमधील परराष्ट्र मंत्र्यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; प्रियांका गांधी संतापल्या…

Priyanka Gandhi | तालिबान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले अमीर खान मुतक्की भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला एकाही महिला पत्रकाराला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने महिलांवर अनेक कठोर निर्बंध लावले आहेत. यातच आता पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना प्रवेश बंदी करण्यात आल्याने तालिबानी फर्मानाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना असलेली प्रवेश बंदी हा अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मांडलेल्या मुद्द्यांपेक्षा अधिक चर्चेचा विषय ठरला. यावर संताप व्यक्त काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. Priyanka Gandhi |
ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, “जर सरकारची महिलांच्या अधिकारांची मान्यता फक्त निवडणुकीच्या फायद्यासाठी नसेल, तर भारतातील सर्वात सक्षम महिलांसोबत झालेल्या या अपमानाला परवानगी कशी देण्यात आली. पंतप्रधान मोदींनी तालिबान प्रतिनिधीच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना हटवण्याबाबत तुमची भूमिका काय आहे? हे स्पष्ट केले पाहिजे. महिलांचे अधिकार हे फक्त निवडणुकीसाठी पोस्टरबाजी नाहीत.” Priyanka Gandhi |
 
Prime Minister @narendramodi ji, please clarify your position on the removal of female journalists from the press conference of the representative of the Taliban on his visit to India.
If your recognition of women’s rights isn’t just convenient posturing from one election to…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 11, 2025
पुढे प्रियांका गांधी म्हणाल्या, “जर महिलांच्या हक्कांबद्दल तुमचा विचार फक्त दिखावा नसेल, तर मला सांगा की आपल्याच देशातील काही सर्वात सक्षम महिलांचा भारतात अपमान कसा होऊ दिला गेला, जेव्हा महिला देशाचा कणा आणि अभिमान आहेत.”
एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये मुत्तकी यांची अनेक विषयांवर चर्चा
दरम्यान, एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये मुत्तकी यांनी द्विपक्षीय व्यापार, मानवीय मदत आमि सुरक्षा सहकार्यावर चर्चा केली. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुत्तक्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “आम्ही लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांना जागा देत नाही. या संघटनांकडून भारतावर अनेक हल्ले केलेत. पाकिस्तानलासुद्धा आवाहन करतो की त्यांनीही दहशतवादी संघटनांना बळ देऊ नये.
आमच्याकडे यांच्यातला एकही नाहीय आणि एक इंचही जमीन त्यांच्या ताब्यात नाहीय. अफगाणिस्तानने जसं शांततेसाठी दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई केली तशी इतरांनीही केली पाहिजे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही देशाविरोधात करू दिला जाणार नाही.” दरम्यान, यावेळी मुत्ताकी यांनी भारत-अफगाणिस्तान संबंध, मानवतावादी मदत, व्यापार आणि सुरक्षा सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
हेही वाचा:





