पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक; “गाझातील शांती प्रक्रियेच्या..”

Narendra Modi And Donald Trump | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझा शांतता करारातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझाच्या शांततेसाठी मुस्लिम देशांनी एकत्र घेऊन प्रस्ताव तयार केला होता. अमेरिकेने इस्त्रायल-हमास युद्ध संपवण्यासाठी 20 कलमी खास प्रस्ताव मांडला. ज्याला इस्त्रायल आणि हमासच नाही तर जगातील अनेक देशांनी पाठिंबा दिला.
हमासला हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी 72 तासांचा वेळ दिला. आता हमासने देखील हा प्रस्ताव मंजूर केला आहे. इस्त्रायल-हमास या दोघांनीही हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करत म्हटले की, “आम्ही गाझातील शांती प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करतो. ओलिसांच्या सुटकेचे संकेत हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारत न्याय्य शांततेच्या दिशेने होणाऱ्या सर्व प्रयत्नांना कायम पाठिंबा देत राहील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
We welcome President Trump’s leadership as peace efforts in Gaza make decisive progress. Indications of the release of hostages mark a significant step forward.
India will continue to strongly support all efforts towards a durable and just peace.@realDonaldTrump @POTUS
— Narendra Modi (@narendramodi) October 4, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले आभार
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यास मदत करणाऱ्या सर्व देशांचे आभार मानले. ते म्हणाले, “हे घडवून आणण्यासाठी मला मदत करणाऱ्या सर्व देशांचे मी आभार मानू इच्छितो. इतक्या लोकांनी कठोर संघर्ष केला. हा एक मोठा दिवस आहे. काय होते ते पाहूया. आपल्याला अंतिम निर्णय घ्यावा लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी ओलिस त्यांच्या कुटुंबियांकडे परतण्याची वाट पाहत आहे. दुर्दैवाने, काही ओलिस, ते कोणत्या परिस्थितीत आहेत हे तुम्हाला माहिती आहे.”
दरम्यान, मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प सतत दावा करत आहेत की, त्यांनी जगातील सात युद्ध रोखली. आता इस्त्रायल आणि हमासच्या युद्धाच्या प्रस्तावानंतर डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांती पुरस्कारासाठी दावा करतील, असे म्हंटले जात आहे. Narendra Modi And Donald Trump |
हेही वाचा:
Soha Ali khan Birthday: पटौदी घराण्याची लाडकी सोहा अली खान : ऑक्सफर्ड ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास





